adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

खाकीचा थरार...३६ तासांचा माग अन् नराधम गजाआड..! कोतवाली पोलिसांचे पुण्यात 'ऑपरेशन मुस्कान' फत्ते..'त्या' अल्पवयीन मुलीची केली सुरक्षित सुटका..!

 खाकीचा थरार...३६ तासांचा माग अन् नराधम गजाआड..! कोतवाली पोलिसांचे पुण्यात 'ऑपरेशन मुस्कान' फत्ते..'त्या' अल्पवयीन मुलीची के...

 खाकीचा थरार...३६ तासांचा माग अन् नराधम गजाआड..! कोतवाली पोलिसांचे पुण्यात 'ऑपरेशन मुस्कान' फत्ते..'त्या' अल्पवयीन मुलीची केली सुरक्षित सुटका..! 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:- कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण झालेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहे.'ऑपरेशन मुस्कान' अभियानांतर्गत कोतवाली पोलिसांनी थेट पुणे गाठून तब्बल ३६ तासांचे थरारक रेस्क्यू ऑपरेशन राबवत मुलीची सुटका केली,तर अपहरण करणाऱ्या संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.प्रदीप उर्फ व्हन्या परशुराम इजगत (रा.रेल्वे स्टेशन बोहरी चाळ, अहिल्यानगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.दि.१८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सदर अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते.पालकांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २८९/२०२६ BNS १३७(२) प्रमाणे गुन्हा दाखल होता.आरोपी आणि मुलगी पुणे शहरातील वानवडी पोलीस स्टेशन हद्दीत असल्याची गोपनीय माहिती कोतवालीचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली.माहिती मिळताच पोलिसांचे विशेष पथक पुण्यात रवाना झाले.वानवडी पोलिसांच्या मदतीने आणि तांत्रिक विश्लेषणाच्या (Technical Analysis) आधारे सलग ३६ तास कसून तपास करत पोलिसांनी दोघांना शोधून काढले.मुलीला सुरक्षित ताब्यात घेत आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या.सदरची धडाकेबाज कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड

तपासी अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील,महिला पोलीस कॉन्स्टेबल श्वेता परमासागर, पोलीस अंमलदार याकूब सय्यद,अमोल गाडे

दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू व नितीन शिंदे यांनी केली आहे.गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील करीत आहेत.पोलिसांच्या या तत्परतेमुळे एका अल्पवयीन मुलीची सुटका झाल्याने कोतवाली पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments