adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मेहकर येथे आदर्श गुरूबंधू देविदास शर्मा यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव

 मेहकर येथे आदर्श गुरूबंधू देविदास शर्मा यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव  खामगाव तालुका प्रतिनिधी : पल्लवी पाटील (संपादक -:- हेमकांत ...

 मेहकर येथे आदर्श गुरूबंधू देविदास शर्मा यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव 


खामगाव तालुका प्रतिनिधी : पल्लवी पाटील

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मेहकर येथे आदर्श गुरूबंधू तथा समाजसेवक देविदास उर्फ मुन्ना शर्मा यांचा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सामाजिक, धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात गेल्या २६ वर्षांपासून निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या शर्मा यांच्या कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला.

खामगाव येथील सतीफैल परिसरात वास्तव्यास असलेले देविदास शर्मा हे अत्यंत साधे राहणीमान व सेवाभावी वृत्तीमुळे परिचित आहेत. लहानपणापासूनच त्यांना धार्मिक, आध्यात्मिक व सामाजिक कार्याची आवड असून त्यांनी सन २००० मध्ये मंडळाची स्थापना केली. तेव्हापासून सातत्याने प्रामाणिकपणे मंडळाची धुरा सांभाळत विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित आहेत.

त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार, भारत गौरव पुरस्कार, महाराष्ट्र बहुजन रत्न पुरस्कार, विश्वकर्मा रत्न पुरस्कार, नॅशनल आयकॉन अवार्ड तसेच इंडियन एक्सलेन्स अवार्ड यांसारखे अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विविध सामाजिक व धार्मिक संघटनांकडूनही त्यांचा अनेक वेळा सन्मान करण्यात आला आहे.

दि. १२ मे रोजी मेहकर येथील वेदिका लॉनमध्ये आयोजित कार्यक्रमात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी दिलीप झापर्डे व विनोद सुकाळे यांचाही सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास सेवानिवृत्त शिक्षक साहेबराव तुपकर, सेवानिवृत्त मंडळ अधिकारी रुपराव तुपकर, माजी ग्रामसदस्य हिम्मतराव तुपकर, अध्यक्ष गुलाबराव तुपकर, अशोक तुपकर, शिक्षक दीपक तुपकर, शिक्षक नितीन तुपकर, ग्रंथपाल लक्ष्मण तुपकर, ग्रामपंचायत सदस्य जगदीश तुपकर, चेतन तुपकर, प्रदीप तुपकर, गजानन तुपकर, विजय तुपकर, समाधान तुपकर, गणेश तुपकर, जानकीराम तुपकर, भागवत तुपकर, भास्कर तुपकर, जनार्धन तुपकर, आसाराम तुपकर, विष्णू तुपकर यांच्यासह महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments