adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ऐतिहासिक ठेवा होणार आता डिजिटल..! अहिल्यानगर जिल्ह्यातील मंदिरांमधील प्राचीन हस्तलिखिते व ग्रंथांचे होणार जतन..! भारत सरकारचा महत्त्वाकांक्षी 'ज्ञान भारतम्' प्रकल्प..दुर्मिळ दस्तऐवज ॲपवर अपलोड करण्याचे धर्मादाय उपआयुक्त न.वा.जगताप यांचे आवाहन

 ऐतिहासिक ठेवा होणार आता डिजिटल..! अहिल्यानगर जिल्ह्यातील मंदिरांमधील प्राचीन हस्तलिखिते व ग्रंथांचे होणार जतन..! भारत सरकारचा महत्त्वाकांक्...

 ऐतिहासिक ठेवा होणार आता डिजिटल..! अहिल्यानगर जिल्ह्यातील मंदिरांमधील प्राचीन हस्तलिखिते व ग्रंथांचे होणार जतन..! भारत सरकारचा महत्त्वाकांक्षी 'ज्ञान भारतम्' प्रकल्प..दुर्मिळ दस्तऐवज ॲपवर अपलोड करण्याचे धर्मादाय उपआयुक्त न.वा.जगताप यांचे आवाहन 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:- भारतीय ज्ञान परंपरेचा प्राचीन,दुर्मिळ आणि समृद्ध वारसा येणाऱ्या पिढ्यांसाठी जतन करण्यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या वतीने 'ज्ञान भारतम्' हा विशेष राष्ट्रीय प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.या प्रकल्पांतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत सार्वजनिक विश्वस्त संस्थांनी (ट्रस्ट),मठांनी आणि मंदिरांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेले जुने ग्रंथ,प्राचीन हस्तलिखिते आणि शिलालेख यांचे सर्वेक्षण,संवर्धन व डिजिटायझेशन करण्यासाठी पुढे यावे,असे आवाहन अहिल्यानगर जिल्ह्याचे धर्मादाय उपआयुक्त श्री. न. वा. जगताप यांनी एका जाहीर प्रकटनाद्वारे केले आहे.या मोहिमेमुळे शेकडो वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा कायमस्वरूपी सुरक्षित होणार असून,तो जगभरातील अभ्यासकांसाठी डिजिटल स्वरूपात उपलब्ध होऊ शकणार आहे.'ज्ञान भारतम्' (Gyan Bharatam) मोबाईल ॲपवर माहिती नोंदवणे बंधनकारक

केंद्र सरकारने या मोहिमेसाठी खास 'Gyan Bharatam' नावाचे अधिकृत मोबाईल ॲप्लिकेशन (Mobile Application) विकसित केले आहे.ज्या नोंदणीकृत न्यासांकडे (Trust) अत्यंत जुनी हस्तलिखिते, दुर्मिळ ग्रंथ, प्राचीन मोडी किंवा ब्राह्मी लिपीतील दस्तऐवज, शिलालेख किंवा ऐतिहासिक कागदपत्रे उपलब्ध आहेत, त्यांनी या ॲपवर जाऊन त्याची माहिती भरायची आहे.

माहितीसोबतच संबंधित दुर्मिळ ठेव्याचे स्पष्ट फोटो देखील या ॲपवर अपलोड करायचे आहेत.अहिल्यानगर जिल्ह्याला फार मोठा ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेला आहे. जिल्ह्यातील अनेक जुन्या मंदिरांमध्ये, संतांच्या मठांमध्ये आणि संस्थांकडे शेकडो वर्षे जुने ग्रंथ आणि हस्तलिखिते आजही जतन करून ठेवलेली आहेत. मात्र, योग्य देखभाली अभावी हा ठेवा नष्ट होण्याचा धोका असतो. केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे या ऐतिहासिक व सांस्कृतिक ठेव्याचे वैज्ञानिक पद्धतीने संवर्धन (Conservation) केले जाईल आणि त्याचे डिजिटल रूप तयार करून ते सुरक्षित केले जाईल.

धर्मादाय उपआयुक्तांचे आवाहन:

"हा प्रकल्प केवळ एक शासकीय मोहीम नसून आपल्या पूर्वजांनी दिलेला ज्ञानाचा वारसा जतन करण्याचे राष्ट्रीय कार्य आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त सार्वजनिक न्यासांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे.आपल्याकडील प्राचीन ठेव्याची माहिती डिजिटल प्रणालीवर नोंदवून हा संवर्धन प्रकल्प यशस्वी करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन 

– श्री. न. वा. जगताप (धर्मादाय उपआयुक्त, अहिल्यानगर यांनी केले आहे.या राष्ट्रीय कार्यात जिल्ह्यातील सर्व मंदिरांच्या आणि संस्थांच्या विश्वस्तांनी तातडीने पावले उचलून आपल्याकडील साहित्याची नोंद करावी,अशी विनंती सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडून करण्यात आली आहे.

No comments