adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अल्पसंख्याक बहुल भागांच्या विकासासाठी फैजपूर नगरपालिकेकडून १० कोटी निधीची मागणी

 अल्पसंख्याक बहुल भागांच्या विकासासाठी फैजपूर नगरपालिकेकडून १० कोटी निधीची मागणी अल्पसंख्याक मंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे प्रस्ताव सादर क...

 अल्पसंख्याक बहुल भागांच्या विकासासाठी फैजपूर नगरपालिकेकडून १० कोटी निधीची मागणी

अल्पसंख्याक मंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्याची मागणी 


इदू पिंजारी | फैजपूर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक १ व प्रभाग क्रमांक ३ मधील अल्पसंख्याक बहुल वस्त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगरसेविका सुमय्याबी शेख कुरबान आणि गटनेत्या शफुरा शेख महेमूद यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, प्रभागातील मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये रस्ते, गटारे, जलकुंभ, स्ट्रीट लाईट, सामाजिक सभागृह, बगीचे आदी मूलभूत सुविधांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. मात्र २०२१ ते २०२५ या कालावधीत विविध प्रशासकीय अडचणींमुळे अनेक विकासकामे रखडल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

तसेच राज्याच्या अल्पसंख्याक विकासासाठी सकारात्मक भूमिका घेणाऱ्या मंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे फैजपूर नगरपालिकेमार्फत सुमारे १० कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव पाठवण्यात यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. या निधीतून प्रभाग क्रमांक १ मधील तहानगर तसेच प्रभाग क्रमांक ३ मधील मिल्लतनगर परिसरात रस्ते, गटारे, जलकुंभ, सामाजिक सभागृह, बगीचे आणि इतर मूलभूत विकासकामे तातडीने हाती घेण्यात यावीत, अशी मागणी नगरसेविका सुमय्याबी शेख कुरबान व गटनेत्या शफुरा शेख महेमूद यांनी केली आहे.

No comments