पाचोरा येथील दबंग पत्रकार आबासाहेब सूर्यवंशी राष्ट्रीय पत्रकार कार्यकारणीत विराजमान ! निर्भीड पत्रकार सडेतोड बेधडक बातमीपत्र जिद्द, मेहनत आ...
पाचोरा येथील दबंग पत्रकार आबासाहेब सूर्यवंशी राष्ट्रीय पत्रकार कार्यकारणीत विराजमान !
निर्भीड पत्रकार सडेतोड बेधडक बातमीपत्र जिद्द, मेहनत आणि संघर्षाला मिळाला सन्मान!
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अनेक वर्षांपासून वृत्तसेवेत कार्यरत पत्रकार सध्या दैनिक प्रहार व दैनिक भास्कर ची धूरा यशस्वीपणे सांभाळून वर्तमानपत्रात आपल्या रोखठोक निर्भीड निडर सडेतोड बेधडक बातमीपत्र लिखाणाची खास शैलीत छाप पाडून यशाची शिखरे पादाक्रांत करणारे जिल्हा राज्य भरात प्रख्यात पाचोरा येथील डॅशिंग पत्रकार आबासाहेब लक्ष्मण सुर्यवंशी यांची पत्रकार बांधवांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणाऱ्या देशपातळीवरील आदर्श पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत पाचोरा (जि. जळगाव) येथील दैनिक प्रहारचे कर्तव्यदक्ष पत्रकार आबासाहेब लक्ष्मण सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अजयकुमार मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा
महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून नव्या कार्यकारणीची घोषणा नुकतीच करण्यात आली. देशभरात वेगाने विस्तारत असलेल्या या संघटनेने पत्रकारांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेतली असून विविध राज्यांमध्ये संघटनेचे जाळे मजबूत होत आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अजयकुमार मिश्रा यांच्या सक्षम नेतृत्वाखाली संघटना पत्रकार बांधवांच्या हक्कांसाठी प्रभावीपणे लढा देत आहे. अलीकडेच पत्रकारांच्या विविध मागण्यांसंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही सादर करण्यात आलेआहे.
महाराष्ट्रात संघटनेची पायाभरणी भक्कम करण्यासाठी आणि पत्रकारांच्या हितासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत आबासाहेब सूर्यवंशी यांना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान देण्यात आले आहे. त्यांच्या या निवडीमुळे पाचोरा तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments