चुंचाळे येथील अरुण सोमा कोळी यांच्या सेवानिवृत्त सोहळ्यानिमीत्त भव्य दिव्य संगीतमय भागवत कथा सप्ताहाचे आयोजन भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी ...
चुंचाळे येथील अरुण सोमा कोळी यांच्या सेवानिवृत्त सोहळ्यानिमीत्त भव्य दिव्य संगीतमय भागवत कथा सप्ताहाचे आयोजन
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल :- तालुक्यातील चुंचाळे येथील श्री समर्थ वासुदेव बाबा यांचे शिष्य व श्री समर्थ रघुनाथ बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिपाई अरुण सोमा कोळी हे दिनांक 31 मे 2026 रोजी आपल्या 33 वर्षाच्या प्रदिर्घ आणि निष्ठावंत सेवा व अतुलनीय योगदानातून सेवानिवृत्त होत आहे त्यानिमित्ताने अरुण सोमा कोळी यांच्या सेवानिवृत्त सोहळ्यानिमीत्त श्री समर्थ सद्गुरु वासुदेव बाबा यांच्या आशीर्वादाने व राष्ट्रीय कीर्तनकार ह भ प गजानन महाराज धानोरेकर यांच्या प्रेरणेने भव्य दिव्य संगीतमय भागवत कथा सप्ताहाचे आयोजन त्याच्या परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे दि.31 मे ते 7 जुन दरम्यान भव्य दिव्य संगीतमय भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे वाल्मिकी आश्रम चिचखेडा राष्ट्रीय किर्तनकार ह.भ.प. गजानन महाराज धानोरेकर कथेचे प्रवक्ते म्हणून लाभणार आहे दिनांक 31 मे ते 7 जुन पर्यंत रात्री 8 ते 10 वाजेदरम्यान कथा होईल त्याचप्रमाणे सप्ताहात दररोज सकाळी 5 ते 6 काकडा, संध्याकाळी 5 ते 6 हरिपाठ आणि रात्री 8 ते 10 कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
कार्यमाची रुपरेषा अशी दिनांक 7 जुन ला सकाळी 8 ते 12 निरोप समारंभ 12 ते 3 स्नेहभोजन 5 ते 7 दिंडी सोहळा व 8 ते 10 काल्याचे किर्तन होईल
तरी परिसरातील भाविक भक्तानी महिला वर्गाने अमृत योगाचा लाभ घ्यावा असे आवाहन अरुण सोमा कोळी, निर्जला अरुण कोळी व अमोल अरुण कोळी यानी केले आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवराज पाटील सर, प्रल्हाद पाटील, मयाराम धनगर, संजय चौधरी, प्रकाश चौधरी,अशोकसिंग राजपूत, लोटू धनगर, सुधाकर चौधरी, किरण तेली, साहेबराव राजपूत, प्रमोद चौधरी हे परिश्रम घेणार आहे

No comments