'विनापरवाना कोळसा वाहतूक करणारी ट्रक यावल वन विभागाच्या ताब्यात भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल वन विभाग...
'विनापरवाना कोळसा वाहतूक करणारी ट्रक यावल वन विभागाच्या ताब्यात
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल वन विभागाच्या यावल पश्चिम व हरिपुरा राऊंड स्टाफ यावल किनगाव रस्त्यावर गस्त घालीत असताना दिनांक 21 मे 26 रोजी रात्री विनापरवाना कोळसा भरलेली ट्रक यावल पश्चिम च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिनांक 21 मे 26 रोजी रात्री जप्त केली. सदर गाडीचा पंचनामा करून यावल वनविभागाच्या डेपो मध्ये लावण्यात आल्याचे सांगण्यात आले
यावल पश्चिम व हरिपुरा राऊंड स्टॉप यावल ते किनगाव रस्त्यानेगस्त करत असताना कोळसा अवैध वाहतूक करीत असल्याचा संशयावरून वाहन क्रमांक एम एच 19 सी एक्स 41 49 थांबून तपासणी केली असता गाडीमध्ये कोळसा वाहतूक करत असल्याचे दिसले सदर वाहतुकीबाबत पासपरवाण्याची विचारणा केली असता ती मिळून आली नाही वाहन चालक याला विचारणा केली असता तो घाबरून गाडी सोडून पसार झाला .सदरचे वाहन वर विभागांनी जप्त केले असून मुख्य विक्री केंद्र यावल येथे जमा केले त्याबाबत वनपाल हरीपुरा यांनी सदरची नोंद केली असून भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41 2 व 42 चे उल्लंघन झाल्यामुळे गुन्हा दाखल केले आहे .सदरची कारवाई उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव सौरीष सहाय तसेच समाधान पाटील सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व कॅम्प यावल विभाग जळगाव आणि प्रशांत जोशी वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पश्चिम यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कार्यवाहीत संजय इंडे वन परिमंडळ अधिकारी हरिपुरा वनरक्षक श्री सुधीर पटणे योगेश मुंडे श्रीमती सरला भोंगरी व वनसेवक या पथकाने ही कारवाई केली.
सदर ट्रक कुठला ? ट्रकचा मालक कोण ? कोळसा कुठून आणला ?गाडीमध्ये किती कोळसा भरलेला होता ?विना परवाना वाहतूक करताना त्याला कोणत्या अधिकाऱ्याने आशीर्वाद दिला ?असे वेगवेगळे प्रश्न आता यावल पश्चिम वनविभागाच्या अधिकाऱ्याकडे चौकशीसाठी आव्हानात्मक असून आता यावल वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी पुढे काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे .

No comments