फैजपूर येथे सम्राट बुद्ध विहारात यावल तालुका कार्यकारिणी सभेचे आयोजन इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर येथील सम्राट बुद...
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथील सम्राट बुद्ध विहार येथे दि. १५ मे २०२६ (शुक्रवार) रोजी भारतीय बौद्ध महासभा, यावल तालुका कार्यकारिणी निवड सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा सकाळी ११ वाजता पार पडणार आहे.
या सभेत यावल तालुक्याच्या नवीन कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यात येणार असून, कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सुमंगल उर्फ रवींद्र अहिरे, प्रा. डॉ. संजीव सावळे, सुशील कुमार हिवाळे, रमेश सावळे, डॉ. के. वाय. सुरवाडे, संघरत्न दामोदरे, विजय अवसरमल तसेच यावल तालुका अध्यक्ष बी. डी. महाले यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे.
या बैठकीस धम्म उपासक, श्रामणेर, बौद्धाचार्य, तसेच केंद्रीय शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
No comments