adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चौगाव किल्ला रस्त्याची दुरवस्था; पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची पर्यटकांची मागणी

 चौगाव किल्ला रस्त्याची दुरवस्था; पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची पर्यटकांची मागणी  विश्राम तेले चौगाव  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव जिल्ह्...

 चौगाव किल्ला रस्त्याची दुरवस्था; पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची पर्यटकांची मागणी 


विश्राम तेले चौगाव 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगाव जिल्ह्यातील चोपडा पासून अवघ्या १५ कि.मी. अंतरावर असलेला ऐतिहासिक व निसर्गरम्य असा चौगाव किल्ला सध्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे चर्चेत आला आहे. पावसाळा तोंडावर असताना किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी पर्यटक व स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

बाराव्या शतकातील अहिर राजवटीच्या काळात भैरव घाटावर लक्ष ठेवण्यासाठी सुमारे २७ एकर क्षेत्रात उभारण्यात आलेला हा डोंगरी किल्ला ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण मानला जातो. किल्ल्यावर शालीवाहन काळातील लेण्या, एकाच दगडात कोरलेला सप्ततलाव समूह, सुमारे दहा गुंठे परिसरातील गवळी वाडा, दोन भक्कम दरवाजे व तटबंदी अशी वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय पायथ्याशी सापडलेले हेमाडपंथी मंदिराचे अवशेष, राणीकाजल माता समाधी, त्रिवेणी महादेव मंदिर, तसेच तीन नाल्यांचा त्रिवेणी संगम यामुळे हा परिसर धार्मिक, ऐतिहासिक आणि निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.

दरवर्षी जून महिन्यापासून येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र, गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे चौगाव ते किल्ला या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. खड्डेमय व खराब झालेल्या रस्त्यामुळे पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

याशिवाय किल्ल्यावर मूलभूत सुविधा अपुऱ्या असल्याचेही पर्यटकांनी सांगितले. ठिकठिकाणी बसण्यासाठी आसनव्यवस्था, पिण्याचे स्वच्छ पाणी, निवास व्यवस्था, स्वच्छतागृह, किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या, रेलिंग व प्रकाशयोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. तसेच नुकसानग्रस्त मंदिर, तटबंदी, प्रवेशद्वार, गवळी वाडा यांची तातडीने दुरुस्ती करून ऐतिहासिक अवशेषांचे संवर्धन करणे आवश्यक आहे.

चौगाव किल्ल्याभोवती घनदाट जंगल असून येथे विविध प्रकारचे प्राणी, पक्षी व औषधी वनस्पतींची समृद्ध जैवविविधता आढळते. या नैसर्गिक संपत्तीचे जतन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. तसेच किल्ल्यावर अवैध अतिक्रमण, अवशेषांची नासधूस व इतर गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशीही मागणी होत आहे.

No comments