adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महावितरणच्या विरोधात आदर्श नगरातील नागरिक एकवटले वारंवार विजेचा लपंडाव आणि कमी व्होल्टेजमुळे नागरिक त्रस्त

महावितरणच्या विरोधात आदर्श नगरातील नागरिक एकवटले वारंवार विजेचा लपंडाव आणि कमी व्होल्टेजमुळे नागरिक त्रस्त  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमक...

महावितरणच्या विरोधात आदर्श नगरातील नागरिक एकवटले

वारंवार विजेचा लपंडाव आणि कमी व्होल्टेजमुळे नागरिक त्रस्त 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा : सध्या प्रचंड उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून जळगाव जिल्ह्याचे तापमान ४४ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. अशा परिस्थितीत चोपडा शहरातील आदर्श नगर परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. तसेच कमी-जास्त होणाऱ्या व्होल्टेजमुळे अनेक घरांतील इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. याशिवाय घरमालकांची परवानगी न घेता स्मार्ट मीटर बसविण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच अव्वाच्या सव्वा वीजबिल आकारले जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या समस्यांमुळे संतप्त झालेल्या आदर्श नगरातील रहिवाशांनी महावितरण कार्यालय गाठून अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी उपअभियंता बोरसे आणि ज्युनियर इंजिनिअर केदारे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्यात आला. त्यांनी लवकरच नवीन डी.पी. बसवून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. निवेदन देताना लाईनमन खलसे आणि वायरमन सचिन मोरे उपस्थित होते. यावेळी धनराज बडगे, दत्तात्रय सोनवणे, एस. पी. गुरव, सतीश सोनार, अनिल पाटील, अमोल पवार, धनंजय मोतीराळे, अमोल धनगर, गुलाब कोळी तसेच पत्रकार मिलिंद सोनवणे उपस्थित होते.

No comments