बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सौ.जिजाबाई प्रवीण कांडेलकर यांची निवड जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) बोदवड कृषी...
बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सौ.जिजाबाई प्रवीण कांडेलकर यांची निवड
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सौ. जिजाबाई प्रवीण कांडेलकर यांची निवड करण्यात आली. ही निवड माजी महसूल मंत्री तथा ज्येष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सौ. ॲड. रोहिणीताई एकनाथराव खडसे आणि ॲड. रविंद्र भैय्यासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. सभापतीपदी निवड झाल्यानंतर सौ. जिजाबाई कांडेलकर यांनी वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानत, बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रामाणिक व पारदर्शक कारभार करण्याचा निर्धार व्यक्त केला. समितीच्या विकासासाठी गतिमान निर्णय घेऊन शेतकरी, व्यापारी आणि घटकांना न्याय देण्याचे काम प्राधान्याने केले जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आपल्या वर दाखविलेला विश्वास कार्यातून सार्थ ठरविण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या निवडीमुळे परिसरातील शेतकरी व कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

No comments