adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूरात स्व. अजित दादा पवार चषक नाईट क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

 फैजपूरात स्व. अजित दादा पवार चषक नाईट क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद    इदू पिंजारी फैजपुर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर येथे...

 फैजपूरात स्व. अजित दादा पवार चषक नाईट क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद 


  इदू पिंजारी फैजपुर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर येथे स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या “स्व. अजित दादा पवार चषक नाईट क्रिकेट टूर्नामेंट” स्पर्धेला क्रिकेटप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बुधवार (दि. २० मे २०२६) रोजी फैजपूर येथे मोठ्या उत्साहात या नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सावदा नगर परिषदचे गटनेते मा. राजेशभाऊ वानखेडे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष मा. कुरबान शेख करीम यांनी उपस्थिती दर्शविली. 


यावेळी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मा. उमेशभाऊ नेमाडे, फैजपूर पोलीस स्टेशनचे PSI मा. मोईनुद्दीन सय्यद, माजी नगरसेवक मा. शे. जफर शे. असगर, भाजप गटनेते मा. सिद्धेश्वर वाघुळदे, नगरसेवक मा. पवन अनिल सराफ, मा. अवेश भांजा, मा. सागर होले, मा. हाजी अनवर खाटीक आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मा. वसीम जनाब, मा. मोहसीन भाई, मा. जफर अली, मा. जावेद शेख व मा. उजैफ खान यांनी विशेष परिश्रम घेतले.

या नाईट क्रिकेट स्पर्धेमुळे परिसरातील क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून सामन्यांचा आनंद घेतला.

No comments