adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

खळबळजनक! डिझेल चोरी करत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; १ जण फरार

 खळबळजनक! डिझेल चोरी करत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; १ जण फरार  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायक...

 खळबळजनक! डिझेल चोरी करत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; १ जण फरार 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

राहुरी फॅक्टरी ते कोल्हार रोड परिसरात डिझेल चोरी करून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका सराईत गुन्हेगारांच्या टोळीला जेरबंद करण्यात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. पोलिसांनी गुहा गाव परिसरात सापळा रचून तीन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार, चाकू,लोखंडी कटावणी आणि डिझेलसह एकूण २,१५,४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत टोळीतील एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.गुप्त बातमीदाराने दिली माहिती अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पाहिजे असलेल्या व फरार आरोपींचा शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक १८ मे २०२६ च्या रात्री राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते.या दरम्यान, कोल्हार ते राहुरी रोडने एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार संशयास्पद रित्या फिरत असून, त्यामधील इसम डिझेल चोरी करून दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती गुप्त बातमीदाराकडून पथकाला मिळाली.माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने राहुरी फॅक्टरी ते कोल्हार रोडवर शोधमोहीम सुरू केली. गुहा गाव परिसरात बातमीतील संशयास्पद कार कोल्हारकडून राहुरीच्या दिशेने येताना दिसली. पोलिसांनी तात्काळ कार अडवून त्यातील इसमांना ताब्यात घेतले.

तीन आरोपी अटकेत, एक फरार

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे खालीलप्रमाणे सांगितली:

१) करण राजू उर्फ राजेंद्र साळुंके (वय २२, रा. नांदुर्खी रोड, शिर्डी)

२) सनि उर्फ सल्ल्या राजेंद्र पवार (वय १९, रा. सावळीविहीर, ता. राहाता)

३) जितेंद्र रोहिदास वाघमारे (वय ३३, रा. पिंपळस, ता. राहाता)

तसेच, पोलिसांना पाहून अंधाराचा फायदा घेत पळून गेलेल्या त्यांच्या चौथ्या साथीदाराचे नाव निलेश मोकळ (रा. सावळीविहीर, ता. राहाता) असल्याचे अटकेतील आरोपींनी कबूल केले. फरार आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे.

No comments