adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रात्रीचा थरार...! टोल नाक्यावर 'त्या' आयशरला एलसीबीच्या पथकाने घेरलं आणि तपासणी केली असता समोर आला ७० लाखांचं गुटखा..

 रात्रीचा थरार...! टोल नाक्यावर 'त्या' आयशरला एलसीबीच्या पथकाने घेरलं आणि तपासणी केली असता समोर आला ७० लाखांचं गुटखा..  सचिन मोकळं अ...

 रात्रीचा थरार...! टोल नाक्यावर 'त्या' आयशरला एलसीबीच्या पथकाने घेरलं आणि तपासणी केली असता समोर आला ७० लाखांचं गुटखा.. 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:- रात्रीची शांतता...हिवरगाव टोल नाक्यावर पोलिसांचा गुप्त सापळा...आणि संगमनेरच्या दिशेने वेगाने येणारा 'तो' विटकरी रंगाचा आयशर टेम्पो! पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या एका गुप्त आदेशाने अशी काही चक्रे फिरली की,गुजरातहून पुण्याकडे निघालेल्या गुटखा माफियांच्या साम्राज्याला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) सुरुंग लावला आहे.तब्बल ७० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकाला एका खबऱ्याकडून अत्यंत गोपनीय माहिती मिळाली होती.एक आयशर टेम्पो प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि गुटख्याचा मोठा साठा घेऊन संगमनेर मार्गे पुण्याला जाणार आहे.माहिती मिळताच पथकाने अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना सोबत घेऊन हिवरगाव टोल नाक्यावर दबा धरला.मध्यरात्रीच्या सुमारास संशयित आयशर (क्र. MH-43-BX-2779) दिसताच पोलिसांनी त्याला घेराव घातला. सुरुवातीला चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली,पण जेव्हा पोलिसांनी गाडीची झडती घेतली,तेव्हा आतलं दृश्य पाहून अधिकारीही चक्रावले.पोत्यांखाली लपवलेला लाखो रुपयांचा 'मौत का सामान' (गुटखा) पोलिसांच्या हाती लागला.पोलिसांनी घटनास्थळावरून

१)कन्हैय्यालाल कालुराम गेहलोत (राजस्थान),२)प्रदिपकुमार हरीशंकर कुंवार (मध्य प्रदेश),३)लक्ष्मण बस्तीराम पवार (राजस्थान) या तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.तपासात धक्कादायक माहिती समोर आली की,हा माल वापी (गुजरात) येथून भरला होता आणि तो पुण्यातील निलेश ललवानी नावाच्या व्यक्तीकडे जात होता.ललवानी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.आर.एम.डी. पानमसाला: २८,४४,००० रुपये,रजनिगंधा पानमसाला:१२,०६,४०० रुपये,

सुगंधी तंबाखू व जर्दा: ७ लाख रुपयांहून अधिक,आयशर टेम्पो व मोबाईल: २२,३०,००० रुपये

एकूण किंमत: ६९,७९,४०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही धडाकेबाज कारवाई

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय किरणकुमार कबाडी, उपनिरीक्षक दिपक मेढे,राहुल द्वारके,भिमराज खर्से,राहुल डोके,सतिष भवर यांच्या पथकाने ही कामगिरी केली. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून 'मास्टरमाईंड' ललवानीच्या अटकेनंतर अजून मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

No comments