सराफ विद्यालयातील तीन शिक्षक ‘महाराष्ट्र एक्सलन्स अवॉर्ड 2026’ ने सन्मानित अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलकापूर:– शै...
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर:– शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेलापूर येथील श्री अनंतराव सराफ विद्यालयातील तीन शिक्षकांना ‘महाराष्ट्र एक्सलन्स अवॉर्ड 2026’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा गौरव नुकत्याच मलकापूर येथील प.पू. हेडगेवार सभागृहात पार पडलेल्या भव्य पुरस्कार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
ISO मानांकन प्राप्त डिजिटल प्रेस क्लब ऑफ इंडिया तसेच महाराष्ट्र राज्य मराठी-हिंदी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्याची सुरुवात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व पहिल्या महिला पत्रकार तानुबाई बिरजे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी श्री अनंतराव सराफ विद्यालयाचे आदर्श शिक्षक सावळे सर, एन. जी. इंगळे सर व एस. वाय. कवळे सर यांना त्यांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुरस्कार प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे, हा सन्मान त्यांच्या सहकुटुंबीयांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य मराठी/हिंदी पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्ष मा. सौ. धनश्री काटीकर पाटील होत्या. तसेच शिक्षण विस्तार अधिकारी मा. श्री शिंदे साहेब, प्राचार्य वैभव अढाव (फार्मसी कॉलेज), प्राचार्या सौ. काळपांडे मॅडम, शेतकरी नेते मा. श्री दामोदरजी शर्मा आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन तज्ज्ञ मार्गदर्शक श्री गणगे सर यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले.
या सन्मानामुळे सराफ विद्यालयाच्या शैक्षणिक कार्याची दखल राज्यस्तरावर घेतली गेल्याने परिसरात समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

No comments