स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त चोपडा काँग्रेसतर्फे विनम्र अभिवादन चंद्रकांत पाटील विचखेडा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा : आ...
चंद्रकांत पाटील विचखेडा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा : आज दिनांक २१ मे २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता कस्तुरबा माध्यमिक विद्यालय, चोपडा येथे चोपडा काँग्रेसच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष भैय्यासाहेब ॲड. संदीप सुरेश पाटील तसेच ताईसाहेब डॉ. सौ. स्मिताताई संदीप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. उपस्थित मान्यवरांनी स्व. राजीव गांधी यांनी देशाच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.
या कार्यक्रमास काँग्रेस शहराध्यक्ष नंदकिशोर सांगोरे, तापी सहकारी सूतगिरणी संचालक एस. डी. पाटील, रमाकांत सोनवणे, शशिकांत साळुंखे, दीपक चौधरी, किरण सोनवणे, आरिफ सिद्दीकी, इलियास पटेल, अकिल भाई आदी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments