शेती पिकाला पाणी पुरवठा करायचा कसा? महावितरण तर्फे वीज वितरणात २ तासांची कपात जाहीर! शेतकरी हवालदिल मुबारक तडवी रावेर (संपादक -:- हेमकां...
शेती पिकाला पाणी पुरवठा करायचा कसा? महावितरण तर्फे वीज वितरणात २ तासांची कपात जाहीर! शेतकरी हवालदिल
मुबारक तडवी रावेर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महावितरण विद्युत कंपनीच्या वतीने जळगांव जिल्ह्यात रात्रीच्या वेळेस जंगल फिल्डवर होणारा विद्युत पुरवठ्यात दोन तासांच्या कपातीची सुचना जाहीर केला यामुळे यापुढे शेती साठी आठ तासांऐवजी सहा तासच विज पुरवठा करण्याचे फर्मान सोडले बद्दल शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व रोष व्यक्त केला जात आहे
अगोदरच शेतकरी अतोनात दिवसरात्र काबाडकष्ट घाम गाळून रक्ताचे पाणी करीत शेतीत शेती पिके पिकली त्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत त्यातच अवकाळी पाऊस आसमानी संकटांनी ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना पिकविलेल्या केळी मका गहू हरभरा कापूस या सह अन्य पिकांना हवा तसा हमीभाव मिळत नाही इराण अमेरिका ईजराईल युद्ध वेळी झालेली केळी पिकाची हेळसांड कवडीमोल भावात कोणी केळी घेईना ती परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत आता पुन्हा अवकाळी पाऊस आसमानी संकटांनी मान्सूनच्या अगोदरच दस्तक देत केळी बागांची पडझड नुकसान तर दुष्काळ तेरावा महिना म्हणजे च पेट्रोल डिझेल टंचाई चा सामना केळी निर्यातदार व्यापारी वाहनधारकांना अडथळा येत असल्याने याचा फटका सुध्दा शेतकरी राजाला सहन करावा लागत आहे अशातच महावितरण विद्युत कंपनीच्या या वीज वितरणात 2 तासांची कपात करण्याची जाहीर केल्याने शेतकरी वर्ग आपल्या शेतातील पिकांना पाणी देणार तरी कसा?या निर्णयामुळे शेतकरी राजा कमालीचा बेचैन झाला आहे व महावितरण विद्युत कंपनीच्या कारभारावर तीव्र विरोध रोष नाराजी व्यक्त करीत महावितरण विद्युत कंपनीने त्वरित हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा शेतकरी वर्ग तीव्र आंदोलन छेडण्याचा तयारीत आहेत
प्रतिक्रिया
धनंजय शिरीष चौधरी
कांग्रेस आय जळगांव जिल्हाध्यक्ष
१ महावितरण विद्युत कंपनीने जगाचा पोशिंदा शेतकरी राजाच्या हक्काच्या रात्रीच्या वेळी च्या जंगल फिल्डवर होणारा विद्युत पुरवठ्यात दोन तासांची कपात जाहीर केली आहे त्या निर्णयामुळे शेतकरी वर्गातून असंतोष निर्माण व्यक्त होत आहे तातडीने तो निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे
२ अमोल हरिभाऊ जावळे आमदार रावेर यावल मतदारसंघ
शेतकरी बांधवांना शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी सुरळीत विद्युत करण्यात यावा एम एस सीबी ने विद्युत पुरवठ्यात दोन तासांची कपात रद्द करुन सुरळीतपणे आठ तास वीज पुरवठा करण्याची महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे मागणी केली आहे

No comments