adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

केंद्र शासनाने लादलेल्या महागाई चा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष युवक जिल्हाध्यक्षांचे निषेध आंदोलन. मॅलोडी चाॅकलेट पेट्रोल पंपावर वाटप करुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आगळेवेगळे निषेध.

केंद्र शासनाने लादलेल्या महागाई चा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष युवक जिल्हाध्यक्षांचे निषेध आंदोलन. मॅलोडी चाॅकलेट पेट्रो...

केंद्र शासनाने लादलेल्या महागाई चा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष युवक जिल्हाध्यक्षांचे निषेध आंदोलन.

मॅलोडी चाॅकलेट पेट्रोल पंपावर वाटप करुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आगळेवेगळे निषेध.



नवापूर प्रतिनिधी पंकज आहिरे

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्यावतीने केंद्र शासनाने सामान्य नागरिकांवर लादलेल्या महागाई चा विरोधात संपूर्ण राज्यात राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले होते. त्याच धरतीवर नवापूर शहरातील प्रमुख पेट्रोल पंपासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष विक्किभाऊ मनू बिऱ्हाडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राज्यव्यापी आंदोलनात सहभाग नोंदवला तसेच यावेळी # झोपा काढा, झोपा काढा... मोदी सरकार झोपा काढा,#झोपलेल्या सरकारचे करायचे काय?खाली डोके वरती पाय,#निष्क्रिय सरकार हटाव,देश बचाव,#बहुत हूई महंगाई की मार, भगाओ मोदी सरकार अश्या घोषणांनी परीसर दणाणून सोडला होता. 
यावेळी युवक जिल्हाध्यक्ष विक्किभाऊ मनू बिऱ्हाडे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करतांना सांगितले की,देशात महागाईने उच्चांकन गाठला असतांना तसेच जीवनावश्यक वस्तूं मिळणे दुरापास्त होत असतांना देशाचे पंतप्रधान आणि शासन पश्चिम बंगाल,केरळ,तमिळनाडू,आसाम राज्यांचा निवडणूकांमध्ये व्यस्त होते तसेच पंतप्रधान इटली येथे जाऊन मेलोणी काकूंची भेट घेत सांगतात की,तुमच्या नावाची चाॅकलेट आमच्या देशात भेटते.वेगवेगळ्या राज्यात व विदेशात पंतप्रधान फिरत असून रोड शाॅ करतांना इंधनाचा भरमसाठ वापर हे स्वता करत असल्याचे युवक जिल्हाध्यक्ष विक्किभाऊ मनू बिऱ्हाडे यांनी सांगितले. 
यावेळी निषेध म्हणून मॅलोडी चाॅकलेट पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना देण्यात आले होते.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अनोख्या मॅलोडी चाॅकलेट वाटपाचे ग्राहकांनी कौतुक केले.
पुढील काळात जीवनावश्यक वस्तू, पेट्रोल,डिझेल,चे दर कमी झाले नाहीत तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामार्फत मुंबई येथे आझाद मैदानावर मोठे जन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नंदुरबार युवक जिल्हाध्यक्ष विक्कीभाऊ मनू बिऱ्हाडे,शहराध्यक्ष फरीदभाऊ पठाण,युवक तालुकाध्यक्ष लाजरेश वसावे,युवक तालुका सचिव दीपक वसावे,रविकांत मावची,सोहेल शेख,आकीब शेख,तालुका सदस्य विश्वास वसावे,गौरव कोकणी,आकाश चव्हाण,विक्की कोळी, गौतम सिकलगर,सिध्देश्वर वसावे,यांचेसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक आघाडीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
कायदा व सुव्यवस्थेचा दृष्टीने नवापूर पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली नवापूर पोलिस ठाण्यातील पोलिस अंमलदार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

No comments