adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नसरापूर (जि. पुणे) व केज (जि. बीड) येथील चिमुरड्यांवरील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा.

 नसरापूर (जि. पुणे) व केज (जि. बीड) येथील चिमुरड्यांवरील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा   अरुण धनगर वरणगाव (संपादक -:- हे...

 नसरापूर (जि. पुणे) व केज (जि. बीड) येथील चिमुरड्यांवरील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा 


 अरुण धनगर वरणगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज, जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची भूमी आहे, जिथे महिलांच्या सन्मानाला सर्वोच्च स्थान दिले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांत नसरापूर (पुणे) आणि केज (बीड) येथे ३ ते ४ वर्षांच्या चिमुरड्या मुलींवर ज्या प्रकारे अमानुष अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली, त्या घटनांनी अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. ही माणुसकीला काळिमा फासणारी कृत्ये असून सभ्य समाजात अशा नराधमांना जगण्याचा कोणताही अधिकार नाही.

नसरापूर येथील घटनेत एका ४ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला गेला. ही विकृती केवळ कायद्याचा धाक नसल्याचेच लक्षण आहे. रिपब्लिकन सेना या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत असून, आमच्या खालील प्रमुख मागण्या आहेत:

१. या दोन्ही घटनांतील खटले तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून गुन्हेगारांना एका ठराविक कालमर्यादेत शिक्षा सुनावण्यात यावी.

२. अशा क्रूर गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत दया न दाखवता थेट फाशीची शिक्षा व्हावी, जेणेकरून भविष्यात अशा कृत्यांची पुनरावृत्ती करण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही.

३. संबंधित पीडित कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत आणि कायदेशीर संरक्षण देण्यात यावे.

४. महिला आणि बालकांवरील वाढत्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलावीत आणि गुन्हेगारांमध्ये कायद्याचा जरब निर्माण करावा.जर या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात विलंब झाला किंवा आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला, तर रिपब्लिकन सेना संपूर्ण जिल्ह्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल, ज्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल.

निवेदन सादरकर्ते विनोद सोनवणे जिल्हा नेते,वंदनाताई सोनवणे महिला सेना जिल्हाध्यक्ष, वंदनाताई आराख, महासचिव देवदत्त मकासरे (मेजर), जिल्हा नेते मीना भालेराव, महिला सेना प्रिया ठाकरे, महिला सेना संगीता बाविस्कर, महिला सेना बंटी नरवाडे, जिल्हा पदाधिकारी लीलाधर सपकाळे, शहराध्यक्ष स्वप्नील सोनवणे, आयटी सेल प्रमुख बंटी सोनकांबळे आदी उपस्थित होते.

No comments