अहिल्यानगर: प्रहार करिअर अकॅडमीमधील केबल चोरी करणारी टोळी जेरबंद; एम.आय.डी.सी. पोलिसांची मोठी कारवाई सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेम...
अहिल्यानगर: प्रहार करिअर अकॅडमीमधील केबल चोरी करणारी टोळी जेरबंद; एम.आय.डी.सी. पोलिसांची मोठी कारवाई
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:- इमापूर येथील 'प्रहार करिअर अकॅडमी' च्या नवीन इमारतीच्या बांधकाम सुरू असलेल्या मोकळ्या रूममधून इलेक्ट्रिक वायर आणि केबल्सची चोरी करणाऱ्या सराईत टोळीला गजाआड करण्यात एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनच्या पथकाला मोठे यश आले आहे.याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.प्रहार करिअर अकॅडमीचे कार्यकारी अधिकारी नरेश रमेश गुप्ता (वय ५३ वर्ष,रा.प्रोफेसर कॉलनी,गुलमोहर रोड, अहिल्यानगर) यांनी याप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.९ डिसेंबर २०२५ ते १२ डिसेंबर २०२५ या कालावधीत अज्ञात चोरांनी अकॅडमीच्या इमारतीमधून फिटिंगच्या इलेक्ट्रिक वायर आणि केबल्स चोरून नेल्या होत्या.या फिर्यादीवरून एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) प्रमाणे १३ डिसेंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. माणिक बी.चौधरी यांनी तात्काळ तपास पथक स्थापन केले.नवीन इमारतींच्या बांधकामाच्या ठिकाणी चोऱ्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची माहिती काढत असताना, पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली.या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता,त्यांनी या चोरीची कबुली दिली.अमित उर्फ ऋष्या सुनिल पवार (वय १९ वर्ष,रा.विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ,कॉटेज कॉर्नर,ता. जि.अहिल्यानगर,मूळ रा.सोनई, ता.नेवासा),करण मनोज पवार (वय ३१ वर्ष,रा.मयुर कॉर्नर, कॉटेज बेकरी जवळ,ता.जि. अहिल्यानगर),रोशन उर्फ बुवा वाळू मांजरे (वय २० वर्ष,रा. मुकबधिर शाळेजवळ, ज्ञानसंपदा शाळेमागे,सावेडी,ता. जि.अहिल्यानगर) असे पकडलेल्या आरोपींची नावे आहे.सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक,श्री.वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (नगर ग्रामीण विभाग) श्री.शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि माणिक बी.चौधरी, पोलीस उपनिरीक्षक मनोज मोंढे, सफौ.राकेश खेडकर,तसेच पोलीस अंमलदार राजू सुद्रीक, सचिन आडबल,किशोर जाधव, दिपक फुंदे,नवनाथ दहिफळे, जयसिंग शिंदे,राहुल गुंडू आणि अरुण सांगळे यांच्या पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक श्री.मनोज मोंढे हे करत आहेत.

No comments