चिनावल येथील दांपत्य बेपत्ता! शोधासाठी सावदा पोलीसांचे आवाहन सावदा प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) सावदा पोलीस स्टेशनम...
चिनावल येथील दांपत्य बेपत्ता! शोधासाठी सावदा पोलीसांचे आवाहन
सावदा प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सावदा पोलीस स्टेशनमध्ये दि १६/५/२०२६ दाखल मिसींग मध्ये चिनावल तालुका रावेर येथील पती पत्नी दोघेही दांपत्य हरविल्याची खबर टेकचंद अनिल नेमाडे वय २४वर्षे दिलेल्या खबरीवरून
हरविलेले व्यक्ती 1. अनिल महारु नेमाडे वय-57 व
2. सौ. भारती अनिल नेमाडे वय-46 दोघे रा.चिनावल ता. रावेर मिसींग ठिकाण:दिनांक 16/05/2026 रोजी सकाळी 07.00 वा.चे सुमारास राहते घरातुन चिनावल ता. रावेर जि. जळगाव येथून
खबर देणार याचे वडील व आई हे कोणास काही एक न सांगता घरुन निघुन गेले आहे.
हरविलेले व्यक्तींचे वर्णन - 1). अनिल महारु नेमाडे वय-57, रंगाने निमगोरे, चेहरा लांबट, उंची अंदाजे 5 फुट 8 इंच, केस काळे पांढरे, व समोर टक्कल असलेले, मीशी जाड, उजवा हात अपघातामुळे थोडा कोपरा पासुन कायमचा वाकलेला, गळ्यात तुळशीमाळ घातलेली असे वर्णनाची आहे.
2) सौ. भारती अनिल नेमाडे वय-46, रंगाने, उंची अदाजे 5 फुट 3 इंच, चेहेरा गोल, नाक उंच, केस काळे पांढरे व लांब केस एक वेणी घातलेली, गळ्यात काळ्या मण्याचे मंगळसुत्र, नाक व कान टोचलेले, शरीराने स्थुल, असे वर्णनाची आहे.
तरी त्याचा शोध होणेस विनंती आहे वगैरे मजकुराचे खबर दिले वरुन मिसींग रजि दाखल करण्यात आली असुन तरी सदर मिसींग मधिल पुरूषाचा आपले दुरक्षेत्र/बीट/चौकी हद्दीत ताबे पोलीसा मार्फत शोध घेवुन परीणामी अहवाल त्वरीत इकडेस कळविण्यास विनंती आहे.दिसल्यास किंवा आढळून आल्यास
सावदा पोलीस स्टेशन फोन क्र. 022584 - 222043
तपासी अंमलदार पोकॉ/2972 रविंद्र महाजन मोक्र. 8356089592
सहाय्यक फौजदार /1602 विनोद पाटील मोक्र. 9823889890 यांच्या संपर्क साधावा अन्यथा कळविण्याचे आवाहन करण्यात येत आहे

No comments