adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

निंभोरा येथील नवीन आरोग्य केंद्र स्थलांतराच्या प्रतिक्षेत? ३कोटींचें नवीन इमारत बांधकाम ठरतंय शोभेची वस्तू!

 निंभोरा येथील नवीन  आरोग्य केंद्र   स्थलांतराच्या प्रतिक्षेत? ३कोटींचें नवीन इमारत बांधकाम ठरतंय शोभेची वस्तू! मुबारक तडवी रावेर   (संपादक ...

 निंभोरा येथील नवीन  आरोग्य केंद्र   स्थलांतराच्या प्रतिक्षेत? ३कोटींचें नवीन इमारत बांधकाम ठरतंय शोभेची वस्तू!


मुबारक तडवी रावेर  

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 रावेर तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथील सुमारे दीड ते दोन वर्षापासून तीन ते साडेतीन कोटी रुपये खर्च करून निंभोरा आरोग्य केंद्राची नविन इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे परंतु या इमारतींमध्ये निव्वळ पाणीपुरवठा व्यवस्था नसल्याने ही इमारत शोपीस ठरत आहे. याबाबत जळगांव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन हे निंभोरा येथे एका खासगी कार्यक्रमा निमित्त आले असता ग्रामस्थांनी त्यांच्याकडे ही बाब निदर्शनास लक्षात आणून देऊन आरोग्य केंद्राचे डॉक्टर हर्षल वाघ कर्मचारी आर.के.पाटील त्याचबरोबर प्रल्हाद बोंडे ,राजीव बोरसे,मनोज सोनार, अनिल बराटे,विजय  सोनार राहुल चौधरी, यासह ग्रामस्थांनी आरोग्य केंद्रात पाणी व्यवस्था करावी व या इमारतीत आरोग्य केंद्राचे स्थलांतर करावे अशी मागणी केली. त्यावेळी महाजन यांनी हा विषय संबंधितांना व ग्रामपंचायत प्रशासनाला कळविल्याने दुसऱ्याच दिवशी ग्रामपंचायत अधिकारी, राहुल लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य डीगंबर चौधरी तसेच प्रशांत पाटील  राजीव बोरसे , ग्रामपंचायत कर्मचारी, संतोष महाले, जितेंद्र जंजाळकर यांनी प्रत्यक्ष निंभोरा आरोग्य केंद्राला भेट देत डॉक्टर हर्षल वाघ यांच्याशी चर्चा करून पाणीपुरवठा व्यवस्था करण्या संदर्भात चर्चा केली व पाणी व्यवस्था दोन दिवसात मार्गी लावण्यात येईल अशी माहिती ग्रामपंचायतचे अधिकारी राहुल लोखंडे यांनी सांगितल्याने आरोग्य केंद्रातर्फे व ग्रामस्थांतर्फे महाजन व ग्रामपंचायतचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.

No comments