चोपडा शहरात देहव्यापार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ११ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल पाच महिलांची सुटका; अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये का...
चोपडा शहरात देहव्यापार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ११ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
पाच महिलांची सुटका; अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा:- शहरातील प्रताप हायस्कूल कडून मागे, तहसील कार्यालयाच्या मार्गाने स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या मोकळ्या जागेत काही पत्रांच्या झोपड्यांमध्ये अनैतिक व्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, या माहितीच्या आधारे
सुरू असलेल्या कथित देहव्यापार अड्ड्यावर चोपडा शहर पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली. या प्रकरणी ११ आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ मे रोजी सायंकाळी सुमारे ६.४० वाजता ही कारवाई करण्यात आली. छाप्यादरम्यान पाच महिलांची सुटका करण्यात आली असून त्यामध्ये राजस्थान, नेपाळ आणि मध्यप्रदेश येथील महिलांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणातील आरोपींमध्ये शिल्या राम लामा (वय ३५), पूजा टेकीराम बागुल (वय २९), शिवाजी मिरगाव पाटील, फरीद कबीर शेख, शाबरब बशीर खान, शरीफ सुभान अली, बाबू उर्फ जतीन चौधरी, फिरोजी ईसा खान, बाबू उर्फ जितेंद्र साबीर खान, संदीप उर्फ संजू लक्ष्मण पाटील आणि सुरेश राजपूत यांचा समावेश आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून ५०० रुपयांची एक नोट (क्रमांक 6VV 700366) तसेच दोन निरोधाचे बॉक्स जप्त केले. आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी झोपड्यांमध्ये देहव्यापार चालवत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२४/२०२६ अन्वये अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ च्या कलम ३, ४, ५ व ७ तसेच भारतीय न्याय संहिता कलम १४३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले करीत आहेत.

No comments