adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ITSE 2025-26 परीक्षेत सर्वोदय विद्यामंदिर प्राथमिक शाळेचे घवघवीत यश

 ITSE 2025-26 परीक्षेत सर्वोदय विद्यामंदिर प्राथमिक शाळेचे घवघवीत यश  चंद्रकांत पाटील विचखेडा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चहार्डी : सर्वोदय...

 ITSE 2025-26 परीक्षेत सर्वोदय विद्यामंदिर प्राथमिक शाळेचे घवघवीत यश 


चंद्रकांत पाटील विचखेडा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चहार्डी : सर्वोदय विद्यामंदिर प्राथमिक शाळा, चहार्डी येथील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी Indian Talent Search Examination (ITSE 2025-26) परीक्षेत उल्लेखनीय व अभिमानास्पद यश संपादन केले आहे.

मनस्वी राजेश पाटील ,जिल्ह्यात - दुसरी

श्लोक महेंद्र पाटील, जिल्ह्यात -  दुसरा 

वंशिका शक्ती अहिरे जिल्ह्यात - तिसरी 

पियुष नेमीचंद चौधरी, केंद्रात -  पहिला 

पायल विकास कोळी, केंद्रात - तिसरी, 

देवाशी प्रवीण पाटील केंद्रात-  तिसरी

🌸 विशेष म्हणजे इयत्ता चौथीतील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन वर्गाचा शंभर टक्के निकाल लागला आहे. विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक यशामुळे सर्वोदय विद्यामंदिर प्राथमिक शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.तसेच चहार्डी विद्या प्रसारक मंडळ चहार्डी  संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉ. सुरेश शामराव पाटील,

उपाध्यक्ष डॉ. पराग पाटील,

सेक्रेटरी ॲड. प्रकाश आनंदराव पाटील,

संस्थेचे सर्व कार्यकारी सदस्य,

शालेय समितीचे चेअरमन व सदस्य,

मुख्याध्यापक तसेच शिक्षक वृंद यांनी मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती पुष्पा सगुनाथ राजपूत यांचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी हे उल्लेखनीय यश संपादन केल्याची भावना सर्व मान्यवरांनी व्यक्त केली व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

No comments