सरकारने वेळ वाया न घालवता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अन्यथा स्वराज्य पक्ष पुन्हा रस्त्यावर उतरणार! युवा नेते शुभम ईसापुरे यांचा सर...
सरकारने वेळ वाया न घालवता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अन्यथा स्वराज्य पक्ष पुन्हा रस्त्यावर उतरणार!
युवा नेते शुभम ईसापुरे यांचा सरकारला सज्जड इशारा, तेल्हाऱ्यात पुन्हा आंदोलनाची ठिणगी पडण्याचे संकेत
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
तेल्हारा:- राज्यातील बळीराजा सध्या अस्मानी आणि सुलतानी अशा दुहेरी संकटांमुळे पूर्णपणे हवालदिल झाला आहे. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे कोणतीही टाळाटाळ किंवा तांत्रिक कारणे पुढे न करता शेतकऱ्यांना तातडीने सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी आक्रमक मागणी स्वराज्य पक्षाचे युवा नेते शुभम ईसापुरे यांनी केली आहे. सरकारने यामध्ये आणखी वेळ वाया घालवल्यास शेतकरी आणि स्वराज्य पक्ष पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करेल, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला आहे.
काही दिवसांपूर्वीच कर्जमाफीच्या मुद्द्यावर स्वराज्य पक्षाचे मुख्य प्रवक्ते प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वाखाली तेल्हारा तालुक्यात एक विशाल मोर्चा काढण्यात आला होता. या ऐतिहासिक मोर्चाने सरकार आणि राज्यातील बड्या राजकीय नेत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. कर्जमुक्तीसाठी राज्यातील हा पहिलाच मोठा मोर्चा ठरला होता. प्रशांत डिक्कर यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सातत्याने आवाज उठवला असून, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आता तालुक्यातून पुन्हा एकदा मोठ्या आंदोलनाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
"शेतकऱ्यांचा संयम सुटत चाललाय!"
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता कोणतीही तांत्रिक कारणे किंवा अटी-शर्ती पुढे न करता सरसकट कर्जमाफीची तात्काळ अंमलबजावणी करावी. शेतकऱ्यांचा संयम आता सुटत चालला आहे. सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास, स्वराज्य पक्ष आणि राज्यातील शेतकरी आधीपेक्षाही अधिक ताकतीने आणि आक्रमकतेने रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारतील. शुभम ईसापुरे यांनी दिलेल्या या थेट आणि आक्रमक इशाऱ्यामुळे आता स्थानिक प्रशासकीय वर्तुळात आणि राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. तेल्हारा तालुक्यातील शेतकरी देखील या मागणीसाठी एकवटत असून आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

No comments