भारतीय बौद्ध महासभा यावल तालुका अध्यक्षपदी केंद्रीय शिक्षक बी. डी. महाले यांची निवड फैजपूर येथे नव्या कार्यकारिणीची घोषणा फैजपूर (इदू पिंजा...
फैजपूर (इदू पिंजारी) :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथील सम्राट बुद्ध विहार येथे दि. १५ मे २०२६ रोजी भारतीय बौद्ध महासभा यावल तालुक्याच्या नव्या कार्यकारिणीच्या पुनर्गठनासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत केंद्रीय शिक्षक बी. डी. महाले यांची यावल तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच सरचिटणीसपदी सुधाकर यादव तायडे आणि कोषाध्यक्षपदी महेंद्र जगन्नाथ पांडव यांची निवड करण्यात आली.
बैठकीच्या प्रारंभी तथागत भगवान बुद्ध आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर बौद्धाचार्य महाले गुरुजी यांनी सामुदायिक बुद्ध वंदना घेतली आणि सभेला सुरुवात झाली. उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सभेच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सुमंगल तथा रविंद्र अहिरे होते. यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष डॉ. प्रा. संजीव साळवे, महाराष्ट्र राज्य पर्यटन सचिव डॉ. के. वाय. सुरवाडे, समता सैनिक दलाचे जिल्हा उपाध्यक्ष लेफ्टनंट कर्नल रमेश साळवे, जिल्हा संस्कार सचिव संघरत्न दामोदर, विजय अवसरमल गुरुजी, जिल्हा संघटक वसुंधराताई मेढे तसेच पारमिता महिला मंडळ अध्यक्षा रेखाताई शैलेश मेढे उपस्थित होत्या.
यावेळी यावल तालुका कार्यकारिणीतील विविध पदांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये उपाध्यक्षपदी विष्णू मेश्राम, उपाध्यक्ष (पर्यटन प्रचार) भागवत पटाईत, उपाध्यक्ष संरक्षण विभाग एसएसडी ज्ञानेश्वर अडकमोल, हिशोब तपासणीसाठी विलास तायडे, कार्यालयीन सचिव चेतन केदारे, महेंद्र भालेराव, संगीत भालेराव, विलास सपकाळे, वैभव तायडे, संरक्षण सचिव बबन धोंडू तायडे, हरी आमोदकर, देविदास साळुंखे, रोशन केदारे, रुद्रा खंदारे आणि शरद तायडे यांची निवड करण्यात आली.
सभेच्या यशस्वी आयोजनासाठी धम्म उपासिका सुमन दिलीप मेढे, मालताबाई प्रकाश मेढे, रेखा आकाश मेढे तसेच चंद्रकला सुपडू मेढे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शन व त्रिशरण पंचशील ग्रहण करून करण्यात आली.

No comments