adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पाडळसा आरोग्य केंद्रामार्फत विरोदा येथे राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा डेंग्यू व चिकनगुनियाबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती; स्वच्छता राखण्याचे आवाहन

 पाडळसा आरोग्य केंद्रामार्फत विरोदा येथे राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा डेंग्यू व चिकनगुनियाबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती; स्वच्छता राखण्याचे ...

 पाडळसा आरोग्य केंद्रामार्फत विरोदा येथे राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा

डेंग्यू व चिकनगुनियाबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती; स्वच्छता राखण्याचे आवाहन 


यावल प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

विरोदा : प्रा. आरोग्य केंद्र पाडळसा अंतर्गत विरोदा येथे शनिवार, दिनांक १६ मे २०२६ रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांमध्ये डेंग्यू व चिकनगुनिया या डासांमुळे होणाऱ्या संसर्गजन्य आजारांबाबत जनजागृती करण्यात आली.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजू तडवी तथा तालुका हिवताप पर्यवेक्षक विजय नेमाडे यांच्या आदेशानुसार हा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमात डेंग्यू आणि चिकनगुनिया या आजारांपासून बचावासाठी डासांची उत्पत्ती रोखणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांनी घराच्या आजूबाजूला पाणी साचू न देणे, झाकण नसलेली भांडी, टायर, नारळाच्या करवंट्या, कुलर तसेच फ्रीजच्या मागील बाजूस साचलेले पाणी नियमित साफ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.

डेंग्यू आजारापासून संरक्षणासाठी अंगावर पूर्ण कपडे घालणे, मच्छरदाणीचा वापर करणे, घरात व परिसरात कीटकनाशक फवारणी करणे, दार-खिडक्यांना जाळी बसवणे तसेच आठवड्यातून एक दिवस “कोरडा दिवस” पाळणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे, गुडनाईट लिक्विड, मच्छर अगरबत्ती, ओडोमास यांसारख्या उपायांचा वापर करणे आणि संध्याकाळी लवकर दारे-खिडक्या बंद करून घेण्याच्या सूचनाही नागरिकांना देण्यात आल्या.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. मुबश्शीर सय्यद, आरोग्य निरीक्षक स्वप्नील भालेराव, आरोग्य सेवक डी. पी. बच्चिरे, आरोग्य सेविका मनीषा जाधव, आशासेविका तसेच गावातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments