adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

खर्डी-धुपा माय रस्त्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; बनावट देशी दारूसह चारचाकी जप्त

 खर्डी-धुपा माय रस्त्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; बनावट देशी दारूसह चारचाकी जप्त चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवा...

 खर्डी-धुपा माय रस्त्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; बनावट देशी दारूसह चारचाकी जप्त


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगाव जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्य निर्मिती,वाहतूक व विक्रीविरोधात धडक कारवाया सुरू असून,डॉ.राजेश देशमुख (भा.प्र.से.)आयुक्त,राज्य उत्पादन शुल्क,महाराष्ट्र राज्य मुंबई,प्रसाद सुर्वे सह आयुक्त (अमलबजावणी व दक्षता), उषा वर्मा विभागीय उप आयुक्त, नाशिक विभाग,तसेच डॉ.विठ्ठल टी.भुकन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात येत आहे.

दि.१९ मे २०२६ रोजी दुय्यम निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, चोपडा बीट क्र.०१ यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, मारुती सुझुकी ८०० कंपनीची सिल्वर रंगाची चारचाकी गाडी क्र.एमएच १९ एइ १५७३ मधून खर्डी-धुपामाय रस्त्याने बनावट देशी मद्याची वाहतूक होणार आहे. सदर माहितीच्या आधारे दि. २० मे २०२६ रोजी सकाळी सुमारे ९.१५ वाजण्याच्या दरम्यान लोणी ते खर्डी शिवार परिसरात सापळा रचण्यात आला.

यावेळी संशयित वाहनाचा पाठलाग करण्यात आला असता संशयित आरोपी गुरुदास अंकूश ठाकरे उर्फ बिल्ला,रा.सुटकार ता.चोपडा हा खर्डी-धुपामाय रस्त्याजवळ भागवत रामदास पाटील यांच्या शेतातील गट क्रमांक ३०/१,मौजे खर्डी शिवार येथे वाहन सोडून फरार झाला.

या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकूण १ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात १ लाख ५० हजार रुपये किमतीची मारुती सुझुकी ८०० कार, तसेच प्रथमदर्शनी बनावट देशी दारू टँगो पंच ९० मि.ली.च्या ४०० सिलबंद बाटल्या किंमत १६ हजार रुपये आणि स्पेशल संत्रा ९० मि.ली.च्या २०० सिलबंद बाटल्या किंमत ८ हजार रुपये असा मुद्देमाल समाविष्ट आहे.

सदर कारवाई के.एन.गायकवाड प्र.निरीक्षक,चोपडा,कु.निकीता पी.खपके दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क चोपडा-१ तसेच जवान नितीन पाटील, भुषण परदेशी आणि दिनेश पाटील यांच्या पथकाने केली.

या प्रकरणी आरोपीविरोधात मुंबई दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत कलम ६५ (अ)(ई), ९० व १०८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कु.निकीता पी.खपके या डॉ.विठ्ठल टी.भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

दरम्यान,राज्य उत्पादन शुल्क विभागाने जनतेला आवाहन केले आहे की,अवैध मद्य निर्मिती,वाहतूक किंवा विक्री संदर्भात कोणतीही माहिती अथवा तक्रार असल्यास विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००३३९९९९ तसेच व्हॉट्सअॅप क्रमांक ८४२२००११३३ वर संपर्क साधावा.

No comments