वलांडीत कुलूपबंद उपकेंद्रावर शेतकऱ्याचा कब्जा ? आरोग्य उपकेंद्रात रुग्ण नाही तर शेतीची औजारे! वलांडी प्रतिनिधी: (संपादक -:- हेमकांत गायकवा...
वलांडीत कुलूपबंद उपकेंद्रावर शेतकऱ्याचा कब्जा ?
आरोग्य उपकेंद्रात रुग्ण नाही तर शेतीची औजारे!
वलांडी प्रतिनिधी:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील वलांडी येथील नवीन वस्तीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बांधण्यात आलेले उपकेंद्र गेल्या अनेक महिन्यांपासून कायम कुलूपबंद असल्याची स्थानिक नागरिकांकडून चर्चा केली जात आहे. शासनाने लाखो रुपये खर्च करून उभारलेली ही इमारत प्रत्यक्षात नागरिकांच्या आरोग्यसेवे ऐवजी दुर्लक्षित अवस्थेत असल्याचे चित्र समोर आले आहे.
सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक प्रतिनिधींनी अनेक वेळा उपकेंद्राला भेट देऊन वेळोवेळी जीपीएस व्हिडिओ व फोटो वेगवेगळे तारखेला केलेले असून पाहणी केली असता त्या पाहणी वेळेस उपकेंद्र बंद अवस्थेत आढळून आले. उपकेंद्राच्या कंपाउंड वॉल मध्ये शेतीसाठी वापरली जाणारी कडबा कटर मशीन, स्प्रिंकलर पाईप, जुनी पत्रे, दारूच्या रिकाम्या बाटल्या तसेच इतर साहित्य ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, उपकेंद्रालगतच्या एका शेतकऱ्याने कंपाउंड परिसराचा वापर स्वतःच्या मालमत्तेसारखा सुरू केला असून शासकीय जागेवर अतिक्रमण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.
इतकेच नव्हे तर उपकेंद्रासमोर जनावरे बांधण्यात येत असल्याचेही आढळले. त्यामुळे आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी उभारण्यात आलेल्या या केंद्राची अवस्था पाहून ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, उपकेंद्रातील कर्मचारी प्रत्यक्ष उपकेंद्रात हजर राहत नसतानाही नियमित पगार घेत आहेत. शासनाकडून मोफत औषधे व निधी उपलब्ध होत असतानाही आरोग्यसेवा पूर्णपणे ठप्प असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकारामुळे शासनाच्या निधीचा गैरवापर होत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी केली आहे. शासकीय जागेवर बेकायदेशीर ताबा घेणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसेच उपकेंद्रावर नियुक्त कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास ८ जून २०२६ रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी दिले वतीने आहे.

No comments