अखेर 'त्या' हायप्रोफाईल सेंटरवर पोलिसांचा छापा.. मॅनेजरसह तिघे पकडले मात्र मुख्य सूत्रधार फरार...स्पा च्या नावाखाली चालायचे नको ते ...
अखेर 'त्या' हायप्रोफाईल सेंटरवर पोलिसांचा छापा.. मॅनेजरसह तिघे पकडले मात्र मुख्य सूत्रधार फरार...स्पा च्या नावाखाली चालायचे नको ते उद्योग
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:- नगर-मनमाड रस्ता परिसरातील व्हीआयपी संस्कृतीच्या आडून सुरू असलेल्या एका मोठ्या हायप्रोफाईल रॅकेटचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने (AHTU) मध्यरात्रीच्या सुमारास पर्दाफाश केला. येथील 'साई मिडास' इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या 'Acqum Spa Center' वर पोलिसांनी डिकॉय (बनावट) ग्राहक पाठवून धाडसी कारवाई केली.या कारवाईत पोलिसांनी मॅनेजर, मदतनीस आणि एका ग्राहकाला रंगेहात अटक केली असून येथील चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांना सदर स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली अश्लील चाळे सुरू असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ दोन पंचांच्या उपस्थितीत 'डिकॉय' (बनावट) ग्राहक तयार केला.या ग्राहकाच्या ताब्यात ५०० रुपयांच्या आठ सरकारी नोटा (क्रमांक नोंद करून) देण्यात आल्या आणि त्याला स्पा सेंटरमध्ये रवाना करण्यात आले.पोलिसांनी बाहेर अंधारात सापळा रचला होता. 'डील फिक्स' होताच बनावट ग्राहकाने पोलिसांना इशारा केला आणि पथकाने थेट इमारतीवर धाड टाकली.पोलिसांनी आत प्रवेश करताच स्पा सेंटरमध्ये प्रचंड खळबळ उडाली.तपासणी दरम्यान 'Iris' नावाच्या केबिनमध्ये बनावट ग्राहक आणि एक महिला आक्षेपार्ह स्थितीत आढळले. तर दुसऱ्या 'AAORE' केबिनमध्ये थेट केरळ राज्यातून आलेला एक ग्राहक एका महिले सोबत रंगेहात मिळून आला. स्टाफ रूममध्ये आणखी दोन महिला पोलिसांना आढळून आल्या.पोलिसांनी सर्व महिलांची सुटका करत त्यांना विश्वासात घेतले असता, "आम्हाला मसाजच्या कामासाठी बोलावून आमच्याकडून जबरदस्तीने अश्लील चाळे करून घेतली जात होती," असा खळबळजनक जबाब त्यांनी दिला.पोलिसांनी घटनास्थळाची झडती घेतली असता,मॅनेजरच्या खिशातून बनावट ग्राहकाला दिलेले हुबेहूब तेच पैसे आणि इतर रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. याशिवाय महागडे मोबाईल फोन आणि मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे.स्पा सेंटरचा मॅनेजर अनिकेत बचाटे (मॅनेजर),काळुराम समिंदर (मदतनीस) व एक ग्राहक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून मात्र या रॅकेटचा मुख्य सूत्रधार संतोष बघे असल्याचे समोर आले असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

No comments