यावल शहरात मध्यरात्री पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन, डांगपुरा,आठवडे बाजार परिसरातून ८ गोवंश पकडले भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमका...
यावल शहरात मध्यरात्री पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन, डांगपुरा,आठवडे बाजार परिसरातून ८ गोवंश पकडले
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल :शहरात बुधवारी रात्री यावल पोलिसांच्या पथकाने मुस्लिम बहुल भागात कोंबिंग ऑपरेशन सुरू केले,यात डांगपुरा व आठवडे बाजार भागातून गोवंश ताब्यात घेण्यात आले यादरम्यान एक गोवंश मोकाट सुसाट सैरावैरा धावू लागल्याने शहरात एकच खळबळ उडाली मोठ्या प्रमाणात हजाराच्या संख्येत नागरिक घराबाहेर आले तर विविध भागात जाऊन पोलिसांनी गोवंश संदर्भात तपासणी देखील केली रात्री उशिरापर्यंत कोंबिंग ऑपरेशन सुरू होते. ८ गोवंश पकडण्यात आले तर ३ जणांवर गुरूवारी गुन्हा दाखल करण्यात आला
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे,सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे,पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन,सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे,हवालदार मोहन तायडे सह पथकाने शहरातील मुस्लिम बहुल भागात यात प्रामुख्याने डांगपुरा, आठवडे बाजार परिसरात कोंबिग ऑपरेशन राबवले.यात काही भागातून त्यांनी गोवंश हस्तगत केले पोलिसांचा मध्यरात्री नंतर हा संपूर्ण फौज फाटा शहरात फिरत होता यादरम्यानच आठवले बाजारभागातून एक गोवंश हे कारवाईदरम्यान सैरावैरा पडू लागले यामुळे शहरात एकच धावपळ उडाली हजाराच्या संख्येत नागरिक रस्त्यावर आले.तर रात्री उशिरापर्यंत पोलिसांच्या पथकाकडून गोवंश शोध मोहीम संदर्भात कोंबिंग ऑपरेशन सुरू होते. ८ गोवंश पकडण्यात आले तर ३ जणांवर गुरूवारी गुन्हा दाखल करण्यात आला
No comments