मुक्ताईनगर येथे ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन; पेट्रोल-डिझेल टंचाई, उपवर्गीकरण व हल्ल्याच्या घटनेचा निषेध तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर (सं...
मुक्ताईनगर येथे ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन; पेट्रोल-डिझेल टंचाई, उपवर्गीकरण व हल्ल्याच्या घटनेचा निषेध
तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
ऑल इंडिया पँथर सेना यांच्या माध्यमातून आज मुक्ताईनगर येथे तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना विविध गंभीर विषयांवर आक्रमक निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. या आंदोलनात्मक निवेदनावेळी जिल्हाध्यक्ष लखन पानपाटील, उपजिल्हाध्यक्ष अजय शेलार, भुसावळ तालुका प्रमुख समीर गाडे, ॲड. देवेंद्र बोदडे, ॲड. अशोक बोदडे, प्रमोद बोदडे आदी मान्यवर उपस्थित होते. निवेदनामध्ये प्रमुख तीन विषयांवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. पहिल्या विषयात जळगाव जिल्ह्यात निर्माण झालेल्या पेट्रोल-डिझेल टंचाईवर तात्काळ कार्यवाही करून सुरळीत पुरवठा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली. नागरिकांना इंधनाअभावी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. दुसऱ्या विषयात संविधान व आरक्षण विरोधी उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ rद्द करण्यात यावा, अशी मागणी करत संघटनेने तीव्र निषेध व्यक्त केला. तसेच फैजपूर येथे एका फोटोग्राफरवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला. संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी ऑल इंडिया पँथर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा देत सांगितले की, शासनाने या सर्व विषयांकडे तात्काळ लक्ष न दिल्यास संपूर्ण जिल्हाभर आंदोलन व मोर्चे काढण्यात येतील.

No comments