यावल तालुक्यात कृतिका फेगडे प्रथम; सर्वत्र कौतुक भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) नुकताच दहावी परीक्षेचा निकाल जाही...
यावल तालुक्यात कृतिका फेगडे प्रथम; सर्वत्र कौतुक
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नुकताच दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून न्हावी येथील जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी कृतिका अजय फेगडे हिने 96 टक्के गुण मिळवून उज्ज्वल यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय यशामुळे तिने यावल तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून मानाचा बहुमान मिळविला आहे.
कृतिका ही यावल येथील सुयश क्लासचे संचालक अजय फेगडे यांची कन्या असून तिच्या या यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक व विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या मेहनतीचे व जिद्दीचे सर्वत्र कौतुक केले जात असून भविष्यातील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा दिल्या

No comments