वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त खडके खुर्द येथे भव्य कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन एरंडोल प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ख...
वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त खडके खुर्द येथे भव्य कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन
एरंडोल प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
खडके खुर्द ता.एरंडोल:- वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या ४८६ व्या जयंतीनिमित्त खडके खुर्द येथे भव्य कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दिनांक ११ मे २०२६ रोजी रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात ह.भ.प. श्री. स्वप्नील महाराज गिरडकर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार असून, परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सदर कार्यक्रम महाराणा प्रतापसिंह स्मारक विठ्ठल मंदिर परिसर जवळ, खडके खुर्द ता.एरंडोल जि.जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे स्वागतोत्सुक राजपूत परिवार, खडके खुर्द यांनी आयोजन केले आहे.

No comments