adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी

 राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी  चंद्रकांत पाटील विचखेडा (संपादक -:- हेमका...

 राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी 


चंद्रकांत पाटील विचखेडा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा :  राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने चोपडा येथील पक्ष कार्यालयात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्व समाजबांधवांना जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छाही देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती उपस्थित होते. त्यांच्या हस्ते राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी बोलताना अरुणभाई गुजराती यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या लोकाभिमुख, पारदर्शक आणि न्यायनिष्ठ प्रशासनाचा गौरव केला. त्यांनी आपल्या कार्यकाळात केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर विकासकामांचा ठसा उमटवत आपले नाव इतिहासात अजरामर केले. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा, प्रत्येकाच्या हाताला काम मिळावे आणि लोककल्याण हेच राज्यकारभाराचे ध्येय असावे, हा आदर्श त्यांनी आपल्या कार्यातून घालून दिल्याचे अरुणभाई गुजराती यांनी सांगितले.

कार्यक्रमास चो. सा. का. चे माजी चेअरमन घनश्यामजी पाटील, शशिकांत देवरे, शशिकांतजी पाटील, लहूश धनगर, डॉ. भरत धनगर, रवींद्र धनगर, दीपक सोनवणे, राकेश पाटील, भाऊसाहेब पाटील, इंद्रजीत पाटील, चंद्रकांत पाटील, प्रभाकर पाटील वंसत काका गुजराथी तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, चोसाका मा व्हाईस चेअरमन शशिकांत देवरे , सुतगिरणी संचालक चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष डॉ भरत धनगर,लहूश धनगर, शेतकी संघ मा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील,वि का सोसायटी भार्डू मा चेअरमन प्रभाकर पाटील, राष्ट्रवादी युवक चे मा तालुका अध्यक्ष दिपक सोनवणे, किसान सेल चे तालुका अध्यक्ष इंद्रजित पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून उपस्थितांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आदर्श समाजापुढे ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.

No comments