adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

धरणगाव येथे विनामूल्य मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त

 धरणगाव येथे विनामूल्य मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त  विकास पाटील  (संपादक : हेमकांत गायकवाड) धरणगाव : ग्रामीण भागातील...

 धरणगाव येथे विनामूल्य मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त 



विकास पाटील 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

धरणगाव : ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये डोळ्यांच्या आजारांबाबत जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने धरणगाव येथे 'अनुलोम संस्था' आणि 'कांताई नेत्रालय' यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात नागरिकांची मोतीबिंदू आणि डोळ्यांची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान गरजू नागरिकांना अत्यंत अल्प दरात चष्मे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच'कांताई नेत्र संजीवनी योजने' अंतर्गत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

शिबिरात नागरिकांचा मोठा सहभाग दिसुन आला

हे शिबिर सकाळी ०९:०० ते दुपारी ०१:०० या वेळेत पार पडले. यामध्ये धरणगाव परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला. तपासणी दरम्यान काही रुग्णांमध्ये डोळ्यांचे गंभीर आजार आढळून आल्याने, त्यांना पुढील उपचारासाठी कांताई नेत्रालय, जळगाव येथे संदर्भित (रेफर) करण्यात आले आहे.

या सामाजिक उपक्रमासाठी 'कृपा ॲक्वा'चे संचालक भिमराज पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी अनुलोममित्र अभय मराठे, राजेंद्र पाटील विकास पाटील यांनी धरणगाव परिसरात प्रत्यक्ष व समाज माध्यमाच्या सहाय्याने प्रचार केला तसेच संस्थेचे प्रतिनिधी म्हणून प्रवीण दांडगे, नयना पाटील, ऋषिकेश बारी, निकिता चौधरी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments