adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

डिजिटल हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याचे तहसील प्रशासनाचे आवाहन दाखला न भरल्यास संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचे वेतन बंद होण्याची शक्यता

  डिजिटल हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याचे तहसील प्रशासनाचे आवाहन दाखला न भरल्यास संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचे वेतन बंद होण्याची शक्यता चोप...

 डिजिटल हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याचे तहसील प्रशासनाचे आवाहन

दाखला न भरल्यास संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचे वेतन बंद होण्याची शक्यता



चोपडा प्रतिनिधी 


(संपादक : हेमकांत गायकवाड)


चोपडा : तहसिल कार्यालय चोपडा येथील (संजय गांधी शाखेमार्फत) राबविण्यात येणाऱ्या केंद्र व राज्य पुरस्कृत विविध निवृत्ती वेतन योजनांतील लाभार्थ्यांनी सन 2025-26 करिता हयातीचे दाखले (डिजिटल लाईफ सर्टिफिकेट) ऑनलाईन पद्धतीने सादर करणे बंधनकारक असल्याची माहिती तहसील प्रशासना तर्फे आव्हान करण्यात आले आहे.

यामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच संजय गांधी दिव्यांग निवृत्ती वेतन विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांचा समावेश आहे. शासन निर्णय क्रमांक विसयो-20218/प्र.क्र.62/विसयो दि.20 ऑगस्ट 2019 तसेच शासन निर्णय क्रमांक केपुयो-2026/प्र.क्र.42/विसयो दि.7 मे 2026 नुसार विविध दाखले सादर करणे आवश्यक करण्यात आले आहे.

लाभार्थ्यांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये उपलब्ध सत्यापन ॲपच्या माध्यमातून अथवा सेतू सुविधा केंद्र, ग्राम महसूल अधिकारी, तलाठी, संगणक परिचालक तसेच जवळच्या आपले सरकार सेवा केंद्राच्या मदतीने डिजिटल हयात प्रमाणपत्र ऑनलाईन प्राप्त करून तहसील कार्यालयातील संजय गांधी शाखेत जमा करावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, शासनाने फेस ऑथेंटिकेशन (Face Authentication) सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे लाभार्थ्यांना सोप्या पद्धतीने ऑनलाईन हयातीचे दाखले सादर करता येणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने दाखला सादर केल्यानंतर त्याची प्रत तहसील कार्यालयात जमा करणे आवश्यक असल्याचेही प्रशासनाने नमूद केले आहे.

डिजिटल हयात प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्यास संबंधित लाभार्थ्यांचे पुढील वेतन ऑनलाईन प्रणालीद्वारे आपोआप बंद होऊ शकते, त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी तात्काळ दाखले सादर करावेत, असे आवाहन नायब तहसिलदार, संजय गांधी योजना शाखा, तहसिल कार्यालय चोपडा यांनी केले आहे.

No comments