ज्येष्ठ समाजसेवक तथा शिक्षण क्षेत्रातील आधारवड कै. दादासाहेब भरतसिंग पाटील यांचे निधन चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) विरवाडे...
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
विरवाडे, ता. चोपडा:- येथील ज्येष्ठ समाजसेवक, शिक्षणप्रेमी व विविध सहकारी संस्थांमध्ये उल्लेखनीय कार्य करणारे कै. दादासाहेब भरतसिंग रामदास पाटील (वय ८५) यांचे रविवार दि. २५ मे २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता दुःखद निधन झाले.
ते विद्याभारती हायस्कूल, विरवाडेचे संस्थापक अध्यक्ष होते. तसेच चोपडा साखर कारखान्याचे संस्थापक संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, चोपडा येथील माजी संचालक आणि पंचायत समितीचे माजी सदस्य म्हणून त्यांनी विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान दिले होते. त्यांच्या निधनामुळे विरवाडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांची अंत्ययात्रा सोमवार दि. २६ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विरवाडे, ता. चोपडा येथून निघणार आहे.
त्यांच्या पश्चात डॉ. धर्मेंद्रसिंग भरतसिंग पाटील (माजी जिल्हा परिषद सदस्य), श्री. प्रफुल्लसिंग भरतसिंग पाटील (माजी ऊस विकास अधिकारी, चोपडा साखर कारखाना), श्री. कुलदीपसिंग भरतसिंग पाटील (सामाजिक कार्यकर्ते) असा परिवार आहे.
कै. दादासाहेब पाटील यांच्या निधनाने सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील एक अभ्यासू आणि सेवाभावी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

No comments