adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रिसोड येथे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे पुतणे धिरज जाधव व डॉ. मनोज ठोकळ यांची पुतणी वैष्णवी ठोकळ यांचा विवाह थाटात संपन्न

 रिसोड येथे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे पुतणे धिरज जाधव व डॉ. मनोज ठोकळ यांची पुतणी वैष्णवी ठोकळ यांचा विवाह थाटात संपन्न  पल्लवी प...

 रिसोड येथे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे पुतणे धिरज जाधव व डॉ. मनोज ठोकळ यांची पुतणी वैष्णवी ठोकळ यांचा विवाह थाटात संपन्न 


पल्लवी पाटील खामगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 रिसोड, जि. वाशिम:-  केंद्रीय आयुष व आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव गणपतराव जाधव यांचे पुतणे चि. धिरज भाऊ जाधव यांचा विवाह संपन्न वधू चि.सौ.कां. वैष्णवी ताई सौ. जयश्री व श्री. गजानन दिनकराव ठोकळ यांची कन्या, डॉ. मनोज ठोकळ यांची पुतणी- रिसोड येथील बालाजी लॉन येथे शाही थाटात विवाह सोहळा- राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती

केंद्रीय आयुष व आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव गणपतराव जाधव यांचे पुतणे, स्व. पंजाबराव गणपतराव जाधव व श्रीमती वर्षाताई जाधव यांचे कनिष्ठ चिरंजीव चि. धिरज भाऊ जाधव यांचा शुभविवाह सौ जयश्री व श्री. गजानन दिनकराव ठोकळ*यांची कन्या तथा *डॉ. मनोज दिनकराव ठोकळ यांची पुतणी चि.सौ.कां. वैष्णवी ताई यांच्यासोबत आज, शुक्रवार दि. 9 मे 2026 रोजी रिसोड येथील बालाजी लॉन येथे मोठ्या उत्साहात व शाही थाटात पार पडला. विवाह सोहळ्यास सकाळपासूनच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावत वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले. बालाजी लॉन परिसर आकर्षक फुलांच्या सजावटीने व रोषणाईने नटला होता. विवाह सोहळ्याप्रसंगी जाधव परिवारातील ज्येष्ठ  श्री. बबनराव तुळशीराम जाधव, श्री. उल्हासराव गणपतराव जाधव, श्री. माधवराव गणपतराव जाधव, श्री. दिलीपराव तुळशीराम जाधव, श्री. विजयराव गणपतराव जाधव, श्री. अनिल बबनराव जाधव यांनी सर्व पाहुण्यांचे आपुलकीने स्वागत केले.वरपिता स्व. पंजाबराव जाधव यांच्या स्मृतींना उजाळा देत अनेकांनी भावना व्यक्त केल्या. धिरज जाधव हे जाधव परिवारातील कनिष्ठ चिरंजीव असून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. 


या शुभप्रसंगी युवा सेना संपर्कप्रमुख श्री. ऋषी भाऊ जाधव, श्री. सोहम वायाळ सर, प्राध्यापक श्री. सचिन भाऊ जाधव, हिंदू सेवक अँड. अमोल भाऊ अंधारे, शिवसेना तालुकाप्रमुख श्री. राजेंद्र बघे, शिवसेनेचे श्री. पिंटू धोरण, युवा सेना खामगाव विधानसभा संपर्कप्रमुख श्री. सागर गावंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. तसेच श्री. सुनिल बबनराव जाधव, श्री. सुचित दिलीपराव जाधव, श्री. प्रविण दिलीपराव जाधव, श्री. मनोज दिलीपराव जाधव, श्री. योगेश पंजाबराव जाधव, चि. संग्राम संजयराव जाधव व जाधव परिवार, ठोकळ परिवारातील सर्व सदस्य, आप्तेष्ट व इष्टमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. अक्षता टाकताना केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांनी वधू-वर चि. धिरज व चि.सौ.कां. वैष्णवी यांना वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व शुभाशीर्वाद दिले. “जाधव व ठोकळ परिवाराच्या ऋणानुबंधातून दोन कुटुंबे एकत्र आली आहेत. नवदांपत्याचे भावी आयुष्य सुख-समृद्धीचे जावो,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. विवाह सोहळ्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला. रिसोड शहरात दिवसभर या शाही विवाह सोहळ्याची चर्चा होती

No comments