adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीत ८३ प्रकरणे निकाली

 चोपडा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीत 83 प्रकरणे निकाली 17 लाख 55 हजार 831 रुपयांची वसुली; दिवाणी, फौजदारी व दाखलपूर्व प्रकरणांचा समावेश  ...

 चोपडा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीत 83 प्रकरणे निकाली

17 लाख 55 हजार 831 रुपयांची वसुली; दिवाणी, फौजदारी व दाखलपूर्व प्रकरणांचा समावेश 


चोपडा प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

उच्च न्यायालय, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या आदेशान्वये शनिवार दि. 9 मे 2026 रोजी चोपडा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. या लोक अदालतीत दिवाणी, फौजदारी तसेच विविध विभागांच्या दाखलपूर्व प्रकरणांचा निपटारा करण्यात येऊन एकूण 17 लाख 55 हजार 831 रुपयांची वसुली करण्यात आली.

राष्ट्रीय लोक अदालतीस सकाळी 10.30 वाजता सुरुवात झाली. यावेळी पॅनलवर दिवाणी न्यायाधीश एस.डब्ल्यू.शेगोकार यांच्या समवेत पंच म्हणून ॲड.एच.एम.सय्यद उपस्थित होते.तसेच सरकारी अभियोक्ता नितीन माळी,चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात,नायब तहसीलदार योगेश पाटील व ग्राम विस्तार अधिकारी जे. पी. पाटील यांनी उपस्थिती दर्शविली.

चोपडा न्यायालयातील एकूण 900 दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणांपैकी 77 प्रकरणे निकाली काढण्यात आली. यात फौजदारीची 41, धनादेश अनादराची 9 व दिवाणी स्वरूपाची 27 प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाली. या प्रकरणांमधून 12 लाख 29 हजार 831 रुपयांची वसुली करण्यात आली.

तसेच बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, बीएसएनएल, महसूल विभाग व महाराष्ट्र राज्य वीज मंडळ यांच्या एकूण 1861 दाखलपूर्व प्रकरणांपैकी 6 प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातून 5 लाख 26 हजार रुपयांची वसुली झाली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बार असोसिएशनचे वकील सदस्य, पोलिस कर्मचारी, न्यायालयीन कर्मचारी, सहाय्यक अधीक्षक, विविध बँकांचे शाखाधिकारी तसेच बीएसएनएल व महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी पॅनल प्रमुखांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

No comments