निट scam प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्या खाजगी शिक्षण कारखानदारीला दणका. लातूर, जि.प्र. (उत्तम माने ) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) प्रा....
निट scam प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्या खाजगी शिक्षण कारखानदारीला दणका.
लातूर, जि.प्र. (उत्तम माने )
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
प्रा. शिवराज मोटेगावकर यांनी काढलेल्या नीट २०२६ च्या गेस पेपरमधील ४३ प्रश्न नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी हुबेहूब जुळले होते. त्यामुळे सुरुवातीपासूनच सीबीआयच्या संशयाची सुई मोटेगावकर यांच्याकडे वळली होती. शिवाय मोटेगावकर यांनी आपल्या क्लासेसचे मार्केटिंग करण्यासाठी 'आपला गेस पेपर कसा तंतोतंत जुळला' अशी शेखी मिरवणारा खास व्हीडीओच बनवून सोशल मीडियावर टाकला होता. ही फुशारकी देखील प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्या अंगाशी आली व पेपरफुटीप्रकरणी प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर सीबीआयने अखेर मोटेगावकर यांना ताब्यात घेतले.
यापूर्वी २०२४ मध्ये पण नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये संशयाची सुई शिवराज मोटेगावकर यांच्या कडे होती. पण काही कारवाई झाली नव्हती. तेव्हा गांभीर्याने घेतले असते तर २०२६ चे प्रकरण घडले नसते असे आता म्हटले जात आहे.
नीट परिक्षेचे क्लासेस म्हणजे डॉक्टर्स बनवण्याचा कारखानाच शिवराज मोटेगावकरांनी उघडला. आपल्या क्लासेसचे मोठे जाळे राज्यभर निर्माण केले. मात्र सीबीआयच्या कारवाई नंतर शिवराज मोटेगावकर यांच्या शैक्षणिक कारखानदारीला जबर हादरा बसला आहे.

No comments