adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा आगाराचा स्वच्छतेत पुन्हा दबदबा; प्रादेशिक स्तरावर द्वितीय क्रमांक "हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियानात" सलग तिसऱ्यांदा मानाचा बहुमान

 चोपडा आगाराचा स्वच्छतेत पुन्हा दबदबा; प्रादेशिक स्तरावर द्वितीय क्रमांक "हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभि...

 चोपडा आगाराचा स्वच्छतेत पुन्हा दबदबा; प्रादेशिक स्तरावर द्वितीय क्रमांक

"हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियानात" सलग तिसऱ्यांदा मानाचा बहुमान  


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने राबविण्यात आलेल्या "हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान २०२५-२६" अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत अ वर्गामध्ये चोपडा आगाराने प्रादेशिक स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावत उत्कृष्ट कामगिरीची परंपरा कायम राखली आहे.

मागील वर्षी राज्यस्तरीय प्रथम क्रमांक आणि प्रादेशिक स्तरावरील प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर यंदाही प्रादेशिक स्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त करून चोपडा आगाराने सलग तिसऱ्यांदा पुरस्कार मिळविण्याचा मान पटकावला आहे. विशेष म्हणजे, अशी उल्लेखनीय कामगिरी करणारे चोपडा आगार महाराष्ट्रातील एकमेव आगार ठरले आहे.

या यशाबद्दल १ जून रोजी नाशिक येथे प्रादेशिक व्यवस्थापक यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, चषक आणि धनादेश देऊन चोपडा आगाराचा सन्मान करण्यात येणार आहे.

या यशामागे आगारातील प्रशासकीय कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, चालक-वाहक तसेच यांत्रिक कर्मचाऱ्यांची अथक मेहनत असल्याचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी सांगितले. याशिवाय सामाजिक व शैक्षणिक संस्था, दानशूर व्यक्ती, लालपरीप्रेमी नागरिक आणि विविध विकासकामांना प्रसिद्धी देणारे पत्रकार बांधव यांचेही मोलाचे योगदान लाभल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच तालुक्याचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार सौ. लताताई सोनवणे, प्रादेशिक व्यवस्थापक विजय गीते, विभाग नियंत्रक प्रज्ञेष बोरसे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे हे यश शक्य झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या अभियानांतर्गत आतापर्यंत चोपडा आगाराला एकूण ६५ लाख रुपयांची बक्षिसे प्राप्त झाली असून तहसील प्रशासन, नगरपरिषद आणि शहर पोलीस प्रशासनाचेही मोलाचे सहकार्य लाभल्याचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी सांगितले.

No comments