adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वाहतूक नियम तोडणार्‍यांविरोधात मलकापूर पोलिसांची धडक कारवाई चार महिन्यांत २३३३ वाहनचालकांवर कारवाई; १३.३९ लाखांचा दंड वसूल

 वाहतूक नियम तोडणार्‍यांविरोधात मलकापूर पोलिसांची धडक कारवाई चार महिन्यांत २३३३ वाहनचालकांवर कारवाई; १३.३९ लाखांचा दंड वसूल  अमोल बावस्कार ब...

 वाहतूक नियम तोडणार्‍यांविरोधात मलकापूर पोलिसांची धडक कारवाई

चार महिन्यांत २३३३ वाहनचालकांवर कारवाई; १३.३९ लाखांचा दंड वसूल 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर:-  शहरात दिवसेंदिवस वाढत असलेली वाहतुकीची समस्या, नियमांचे होणारे उल्लंघन तसेच बेदरकार वाहनचालकांना आळा घालण्यासाठी मलकापूर शहर पोलिसांनी धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली १ जानेवारी २०२६ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत मोटार वाहन कायद्यान्वये तब्बल २३३३ वाहनधारकांविरोधात कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान नियमभंग करणार्‍या वाहनचालकांकडून १३ लाख ३९ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठ परिसर, तसेच शहरातील मार्ग, गर्दीच्या भागांमध्ये वाहतूक शाखा व शहर पोलिसांकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये विनाहेल्मेट वाहन चालविणे, ट्रिपल सीट प्रवास, सीट बेल्टचा वापर न करणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर, नो-पार्किंगमध्ये वाहने उभी करणे, सायलेंसरमध्ये बदल करणे, वाहनांचे आवश्यक कागदपत्र नसणे आदी प्रकारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. 

१ जानेवारी ते ३० एप्रिल दरम्यान वाहन धारकांच्या तपासणी व इतर प्रक्रियेमध्ये तब्बल २३३३ वाहन धारकांविरोधात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करीत त्यांच्याकडून १३ लाख ३९ हजार ३०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.  विशेष म्हणजे अल्पवयीन मुलांकडून वाहन चालविण्याच्या प्रकारातही वाढ होत असल्याने पोलिसांनी पालकांनाही इशारा दिला आहे. वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास केवळ दंडात्मक कारवाईच नव्हे, तर अपघातांचा धोका वाढत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट करून मार्गदर्शनही केले. 

मलकापूर शहरात वाढती वाहनसंख्या आणि वाहतुकीवरील ताण लक्षात घेता पोलिस प्रशासनाकडून वेळोवेळी जनजागृतीही केली जात आहे. शाळा, महाविद्यालये तसेच विविध संस्थांमध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत असून नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments