adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल येथील बोरावल गेट भागात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव.

  यावल येथील बोरावल गेट भागात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव भरत कोळी यावल तालुका प्रतिनिधी:- (संपादक :- हेमकांत गायकवाड) शहरातील बोरावल गेट...

 यावल येथील बोरावल गेट भागात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव



भरत कोळी यावल तालुका प्रतिनिधी:-

(संपादक :- हेमकांत गायकवाड)


शहरातील बोरावल गेट भागातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ एका कार्यक्रमाचे आयोजन करीत इयत्ता १० वीतील गुणवंत विद्यार्थिनींचा गुणगौरव करण्यात आला. शहरातील बाल संस्कार माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी,विद्यार्थी यांचा सत्कार या ठिकाणी करीत त्यांना पुढील वाटचाली करीता शुभेच्छा देण्यात आल्या.

शहरात बोरावल गेट परिसर आहे. या परिसरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा आहे. येथे रविवारी सायंकाळी एका कार्यक्रमाचेे आयोजन करीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात अाला यात प्रामुख्याने शहरातील बाल संस्कार माध्यमिक विद्या मंदिर शाळेतुन इयत्ता १० वी ९१ टक्के गुण मिळवत प्रथम आलेल्या भूमिका सोपान इंगळे, ८९.८० टक्के गुण मिळवत द्वितीय आलेल्या भाग्यश्री अनिल शिरसाट तसेच शहरातील विद्यालयात ९१.६० टक्के गुण मिळवत प्रथम आलेला खुशाल कैलास चौधरी यांचा गुणगौरव प्रसंगी करण्यात आला.भारतरत्न डॉ. बाबा साहेब आंबेडकर नगर येथे सर्व समज बांधवांच्या वतीने या कार्यक्रमासचे आयोजन करण्यात आले.सोबत विद्यार्थ्यांच्या पालकांचे सुद्धा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नगर सेवक उमेश फेगडे होते. विद्यार्थिनींच्या हस्ते डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे पूजन करण्यात आले.तसेच डॉ. विवेक अडकमोल आणी सरांगधर अडकमोल यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. प्रसंगी नगर सेवक योगेश चौधरी, शिक्षिका मनिषा भालेराव, आकाश चोपडे,रोशन येवले,चेतन आढळकर,भूषण फेगडे, बाळू अडकमोल,विनोद भिल,भगवान भिल,अनुराग अडकमोल ,गिरीश सोनावणे,अरुण लोखंडे,विष्णू भालेराव ,सोपान इंगळे, निलेश भोई, किशोर अंकल, सागर कोळी सह आदींचही उपस्थिती होती.-पुर्ण-फोटो आहे..

No comments