adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

उमर्टी गावाच्या विकासासाठी गटविकास अधिकारी अंजली बर्गे यांची तत्परता; नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव

 उमर्टी गावाच्या विकासासाठी गटविकास अधिकारी अंजली बर्गे यांची तत्परता; नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव  चोपडा प्रतिनिधी  (संपादक -:- हेमकांत गा...

 उमर्टी गावाच्या विकासासाठी गटविकास अधिकारी अंजली बर्गे यांची तत्परता; नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव 


चोपडा प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा पंचायत समितीला अखेर कार्यक्षम,जनतेच्या प्रश्नांना तत्काळ प्रतिसाद देणारे अधिकारी लाभल्याची भावना आता नागरिकांमधून व्यक्त होत आहे.चोपडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अंजली बर्गे यांनी आपल्या कार्याची सुरुवातच दमदार पद्धतीने करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राष्ट्रवादी युवक विधानसभा क्षेत्र प्रमुख अमोल राजपूत यांनी पहिल्याच दिवशी उमर्टी गावातील विविध प्रलंबित समस्या गटविकास अधिकारी समोर मांडल्या.समस्येची गांभीर्याने दखल घेत अंजली बर्गे यांनी दुसऱ्याच दिवशी सकाळी साडेसात वाजता स्वतः उमर्टी गावात भेट देत सुरू असलेल्या सर्वे व विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना कामांना तातडीने गती देण्याचे स्पष्ट आदेश दिले.गावातील विकासकामांबाबत दाखवलेली तत्परता, संवेदनशीलता आणि कार्यशैली पाहून ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून “अधिकारी असावा तर असा” अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.

गावकऱ्यांच्या वतीने गटविकास अधिकारी अंजली बर्गे यांचे मनापासून आभार मानण्यात आले. तसेच राष्ट्रवादी युवक विधानसभा क्षेत्र प्रमुख अमोल राजपूत यांनी वही व पेन देऊन गटविकास अधिकारी अंजली बर्गे सन्मानपूर्वक सत्कार केला. यावेळी गावाचे सरपंच रिनेश पावरा, पोलीस पाटील प्रल्हाद भुगवाडे, उपसरपंच सागर सांगोरे, माजी सरपंच राजू पावरा, ग्रामसेवक अशोक पाडवी, माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष पावरा, दीपक राजपूत, सुनील पावरा, करमसिंग भुगवाडे, डोंगरसिंग पावरा, अनिल पावरा, गुलाब दादा भुगवाडे, राजाराम पावरा, अजय पावरा आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमर्टी गावाच्या विकासासाठी प्रशासन व ग्रामस्थ एकत्र येत असल्याचे सकारात्मक चित्र यानिमित्ताने पाहायला मिळाले असून गटविकास अधिकारी अंजली बर्गे यांच्या कार्यपद्धतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

No comments