adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दैदिप्यमान निकाल

 आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दैदिप्यमान निकाल; सायन्स 100%, एकूण निकाल 98.68%  विकास पाटील धरणगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड...

 आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दैदिप्यमान निकाल; सायन्स 100%, एकूण निकाल 98.68% 


विकास पाटील धरणगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

धरणगाव : आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने यंदाच्या शैक्षणिक वर्षातील परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत आपल्या गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाचा एकूण निकाल 98.68% लागला असून कला व विज्ञान या दोन्ही विभागांतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. कला (Arts) विभागाचा निकाल 95.83% लागला असून विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण परिश्रमाच्या जोरावर समाधानकारक यश मिळवले आहे. तर विज्ञान (Science) विभागाने तब्बल 100% निकालाची उज्ज्वल कामगिरी करत विद्यालयाचा लौकिक अधिक उंचावला आहे. कला विभागामध्ये सपना गोपाल इंगळे हिने 79.67% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. नम्रता किशोर मराठे (78.83%) हिने द्वितीय, तर मनीषा अनिल पवार (78.33%) हिने तृतीय क्रमांक मिळवला.

विज्ञान विभागामध्ये मानसी शशिकांत आढावे हिने 89.67% गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला. दिशांत रवींद्र पाटील (87.00%) द्वितीय, तर देवांत रवींद्र पाटील (86.00%) तृतीय क्रमांकावर राहिले. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत व पालकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सी. के. पाटील, उपाध्यक्ष किरण पाटील, सचिव सुरेखा पाटील, संचालक मच्छिंद्र पाटील व अश्विन पाटील, तसेच प्राचार्य संदीपकुमार सोनवणे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यासोबतच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संपूर्ण विद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या या यशामुळे पालकांमध्येही समाधान व्यक्त होत आहे.

No comments