adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

एकनिष्ठा-अदाणी रक्तदान शिबिरात पोलिस अधिकारी व रक्तमित्राचे प्रेरणादायी रक्तदान

 एकनिष्ठा-अदाणी रक्तदान शिबिरात पोलिस अधिकारी व रक्तमित्राचे प्रेरणादायी रक्तदान    पल्लवी पाटील खामगाव  (संपादक:- हेमकांत गायकवाड) दि. २२ म...

 एकनिष्ठा-अदाणी रक्तदान शिबिरात पोलिस अधिकारी व रक्तमित्राचे प्रेरणादायी रक्तदान  


 पल्लवी पाटील खामगाव 

(संपादक:- हेमकांत गायकवाड)

दि. २२ मे २०२६ रोजी एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशन व अदाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय रक्तपेढीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. समाजसेवेचा संदेश देणाऱ्या या शिबिरात पोलिस अधिकारी, रक्तमित्र आणि युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित केले.

शिबिराची सुरुवात SDPO प्रदीप पाटील व रक्तमित्र सुरजभैय्या यादव यांनी रक्तदान करून केली. नियमित रक्तदाता असलेल्या प्रदीप पाटील यांनी रक्तदान करताना, “वर्दीचा अर्थ फक्त गुन्हेगारांना पकडणे नसून, जीव वाचवणेही आहे. एका रक्तपिशवीमुळे तीन जणांचे प्राण वाचू शकतात. एकनिष्ठा फाउंडेशनचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे,” असे सांगितले.

दरम्यान, रक्तमित्र सुरजभैय्या यादव यांनी आपल्या आयुष्यातील ५६ वे रक्तदान करून उपस्थितांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले. २००८ ते २०२६ या १८ वर्षांच्या कालावधीत त्यांनी तब्बल १९.६ लिटर रक्तदान करून सुमारे १६८ गरजू रुग्णांना जीवनदानाचा आधार दिला आहे. अपघातग्रस्त, प्रसूतीदरम्यान अडचणीत सापडलेल्या माता तसेच थॅलेसिमियाग्रस्त बालकांसाठी त्यांचे रक्तदान मोठा आधार ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. 


यावेळी प्रदीप पाटील यांच्या हस्ते सुरजभैय्या यादव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात एकनिष्ठा फाउंडेशनच्या ५० शिलेदारांनी उत्साहाने रक्तदान केले. या रक्तदानामुळे सुमारे १५० रुग्णांना जीवनदानाचा आधार मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

शिबिरात प्रदीप शमी, चेतन कदम, विकास शेगोकार, जयेश पारीक, श्रीराम उगले, शिवम मानकर, ज्ञानेश्वर भोंडे, प्रतिक ताठे, भागवत पाचपोर, अमर गावंडे, राजू खंडारे, विशाल कोळी, पांडुरंग कोळसे, महेश राऊत, ओम सिंघानिया, मंगेश सोळंके, रोहित तंबोले, सागर डांगे, संकेत बाळापूरे, गणेश महाले, नंदकिशोर फरपट, विनोद इंगळे, आशुतोष अग्रवाल, गोविंदा कुकडे, रामेश्वर सुडोकार, शेख अयुब, राहील खान, शेख अन्सार, शेख अकिम, इस्माईल खान, मोहम्मद खलील, जुनेद खान, कामरान देशमुख यांच्यासह अनेक रक्तदात्यांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश पारीक यांनी केले. तसेच अजय कडुकार, राजू घाटे, अजय निंबाळकर, योगेश राऊत, नरेश मसनेवार, कैलास दणके, प्रवीण आखरे, विक्की सारवान, हर्षद कारिया, ईशाक मोहम्मद, तौफिक हस्मानी यांच्यासह सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, रक्तपेढी अधिकारी, तंत्रज्ञ व कर्मचारी यांनी सहकार्य केले.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रदीप पाटील म्हणाले, “एकनिष्ठा फाउंडेशनच्या माध्यमातून रक्तदान चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी आम्ही कायम सहकार्य करू. रक्ताची कमतरता भासू देणार नाही, कारण आमचे कामच आहे – जीव वाचवणे.”

या शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचे आभार प्रदीप शमी, ईशाक मोहम्मद, नारायण सैरीसे व रवि दिपके यांनी मानले. अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे नारायण सैरीसे यांनी दिली.

No comments