adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कर्तव्यदक्ष शिक्षिका सौ. अर्चना अविनाश गोसावी यांना महात्मा फुले समाजभूषण पुरस्कार जाहीर!

 कर्तव्यदक्ष शिक्षिका सौ. अर्चना अविनाश गोसावी यांना महात्मा फुले समाजभूषण पुरस्कार जाहीर!  ( पुणे जिल्हा ) सौ. अनुजा कारखेले-देवरे प्रतिनिध...

 कर्तव्यदक्ष शिक्षिका सौ. अर्चना अविनाश गोसावी यांना महात्मा फुले समाजभूषण पुरस्कार जाहीर!


 ( पुणे जिल्हा ) सौ. अनुजा कारखेले-देवरे प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आपल्या प्रवासात कोणत्याही कामाची पोचपावती मिळावीच असं म्हणण्यात काही वावगे ठरणार नाही,  पुण्यात आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमिंत्त औचित्य साधून महाराष्ट्र श्रम कामगार संघटना आयोजित भारत श्री. कार्य गौरव सोहळा पुणे 2026 च्या पुरस्कारांसाठी कर्तव्यदक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिक्षिका सौ. अर्चना अविनाश गोसावी यांना महात्मा फुले समाजभूषण पुरस्कार जाहीर करून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. सौ. अर्चना गोसावी यांचे परिश्रम कर्तवनिष्ठा व समाजप्रती असलेली बांधिलकी उल्लेखनीय योगदान लक्षात घेवुन वरील पुरस्कारांसाठी ही निवड करण्यात आली आहे. पुण्यात झालेल्या संमेलनात सौ. अर्चना गोसावी यांना मानचिन्ह, सन्मानपत्रक व गौरव चिन्ह देवुन मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले आहे. सौ. अर्चना गोसावी यांच्या जाहीर झालेल्या पुरस्कारांने निवडीबद्दल त्यांचे सर्वच स्तरांतून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. अर्चना गोसावी यांची शालेय शिक्षण क्षेत्रात देखील वेगळ्याच कामाची छाप नेहमीच दिसून येते. सौ. अर्चना गोसावी यांना कर्तव्यदक्ष शिक्षिका म्हणून त्यांना चांगल्याच ओळखल्या जातात. पती अविनाश गोसावी हे पोलीस खात्यात तर पत्नी सौ. अर्चना गोसावी शिक्षण क्षेत्रात असे या गोसावी कुटुंबाची परंपरा आहे.

No comments