जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्याला सुरुवात, धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांची भामर्डी गावाला भेट व जनगणना प्रगनकांना मार्गदर्शन वि...
जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्याला सुरुवात,
धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांची भामर्डी गावाला भेट व जनगणना प्रगनकांना मार्गदर्शन
विकास पाटील धरणगाव
(संपादक हेमकांत गायकवाड)
धरणगाव: देशातील १६ वी आणि स्वातंत्र्यानंतरची ८ वी जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.केंद्र सरकारने पहिला टप्पा म्हणजेच घरांची यादी आणि गृहनिर्माण जनगणना मे-जून २०२६ मध्ये राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
'भारताची जनगणना २०२७' च्या पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली असुन, आज धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी सकाळी ९:३० वाजता भामर्डी गावाला भेट दिली तसेच जनगणना करताना सर्व बाबी विषय काटेकोर मार्गदर्शन केले तसेच पूर्ण तालुक्याची जनगणना लवकरात लवकर पुर्ण करन्याच्या सूचना प्रगनकांना दिल्या आहेत.
या मोहिमेची पाहणी आणि नियोजनासाठी प्रत्यक्ष बैठक पार पडली.यावेळी साळवा मंडळाचे अधिकारी राकेश काळमेघ,ग्राम महसूल अधिकारी रोशन श्रीराम ठाकरे आणि प्रगणक समाधान पाटील,प्रामुख्याने उपस्थित होते तसेच या प्रसंगी भामर्डी येथील सरपंच दगा पाथरवट,ग्रामपंचायत अधिकारी महेश सोनवणे हे उपस्थित होते. तहसीलदार श्री सूर्यवंशी यांनी कामाचा आढावा घेत प्रगणकांना गावाची जनगणना अचूकपणे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
पहिला टप्पा कधी आणि काय होणार?
कालावधी : १६ मे ते १४ जून २०२६ या दरम्यान महाराष्ट्रासह देशभरात घरांची मोजणी होणार आहे.
काम : प्रगणक घरोघरी जाऊन घरांची स्थिती,बांधकामासाठी वापरले साहित्य,खोल्यांची संख्या,पाणी-वीज-शौचालयाची उपलब्धता,कुटुंबातील सदस्यांची संख्या,वाहन,इंटरनेट सुविधा यासह ३४ प्रश्न विचारतील.
दुसरा टप्पा : लोकसंख्या गणना फेब्रुवारी २०२७ मध्ये होणार आहे.धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी तालुक्यातील गावातील नागरिकांनी आपल्या भागात येणाऱ्या प्रगणकांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी व आवश्यक ती सर्व माहिती अचूक व खरी देऊन राष्ट्रीय कार्यात आपले योगदान द्यावे व प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे,असे आवाहन तहसीलदार श्री सूर्यवंशी यांनी केले आहे.

No comments