ओबीसी ऑर्गनायझेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी गुफरान अन्सारी यांची निवड करण्यात यावी - हाजी फयाजभाई बागवान शौकतभाई शेख / श्रीरामपूर: (संपादक...
ओबीसी ऑर्गनायझेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी गुफरान अन्सारी यांची निवड करण्यात यावी - हाजी फयाजभाई बागवान
शौकतभाई शेख / श्रीरामपूर:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गेनाइजेशन शाखा श्रीरामपूर (जिल्हा अहिल्यानगर) च्या वतीने ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय हाजी शब्बीरभाई अन्सारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मेमन जमातीचे जीम्मेदार हाजी अब्दुलगफार पोपटीया होते.
कार्यक्रमाची सुरुवात हापीज जुनेद यांनी कुराण पठणाने केली, याप्रसंगी हाजी शब्बीरभाई अन्सारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत (खिराजे अकिदत) व दुवा पठण करण्यात आली.
यावेळी सर्व ओबीसी समाज बांधवांच्या वतीने एक ठराव एक मताने मंजूर करण्यात आला तो असा की, ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीरभाई अन्सारी यांच्या रिक्त जागी त्यांचे चिरंजीव गुफरान अन्सारी यांना ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बनविण्यात यावे. हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल असा ठराव ओबीसी ऑर्गनायझेशनचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हाजी फैयाजभाई बागवान यांनी मांडला, हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी सर्व समाजाच्या वतीने कुरेशी समाजाचे अध्यक्ष महबूबभाई कुरेशी यांनी आपल्या मनोगतात यांच्या विषयी प्रार्थना करण्याचे सांगितले. माजी नगरसेवक मुक्तारभाई शहा यांनी अन्सारी साहेबां विषयी त्यांनी केलेल्या कामाची माहिती समाज बांधवांना करून दिली. डॉक्टर सलीमभाई शेख यांनी शब्बीरभाई विषयी बोलताना त्यांच्या समाजासाठी केलेल्या त्यागाबद्दल माहिती देत यांनी केलेल्या सामाजाभिमूख कार्याविषयी सखोल माहिती देऊन ओबीसी बांधवांनी मिळवून दिलेला सवलतीच्या फायदा आपल्या मुलांच्या शैक्षणिक फायद्यासाठी करावा अशी विनंतीही केली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक संघटनेचे संघटक जाकीरभाई शहा यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऑर्गेनायझेशनचे उपाध्यक्ष इक्बाल काकर यांनी केले. शेवटी आभार समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी मानले. यावेळी काकर समाजाचे शहराध्यक्ष हाजी इस्माईल काकर चौधरी, अहमदभाई शहा, भांड समाजाचे अमीर बेग मिर्जा, अबुल मणियार, फैयाज मुलानी, सलीम शहा, एस एस ग्रुपचे सलीम शेख, समाजसेवक मुख्तार मणियार, जाफर शाह, आजमभाई शहा, मेडिकल असोसिएशनचे संचालक रियाज पोपटिया, नदीम तांबोळी, सचिव इब्राहिम बागवान, इम्रान बागवान, आवेश शाह,गुफरान बागवान, अतिक तांबोळी, रजत बागवान ,कार्याध्यक्ष आरिफ कुरेशी, सलीम बागवान तथा सर्व पदाधिकारी व सदस्य मान्यवर याप्रसंगी आवर्जून उपस्थित होते.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111


No comments